अभिजीत केळकर, रोहित राऊत, जुईली जोगळेकर यांना कोरोनाची लागण, 'सिंगिग स्टार'च्या सेटवर एकूण ६ जणांना लागण झाल्याने शूट थांबवलं

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 31 August 2020

अभिनेता अभिजीत केळकरनेही नुकतंच त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. यासोबतंच सिंगिग स्टार या शोच्या सेटवर एकुण सहा जण कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचं कळतंय. 

मुंबई- कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. काही वेळापूर्वीच अभिनेता सुबोध भावेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं आणि आता  आणखी ४ प्रसिद्ध कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. अभिनेता अभिजीत केळकरनेही नुकतंच त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. यासोबतंच सिंगिग स्टार या शोच्या सेटवर एकुण सहा जण कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचं कळतंय. 

हे ही वाचा: सुशांतच्या चॅटमधून खुलासा- बहीण प्रियांका देत होती एंजायटी-डिप्रेशनची औषधं घेण्याचा सल्ला, वाचा चॅट

सिंगिग स्टार हा शो सध्या नव्याने सुरु झाला आहे. यात गायकांसोबत कलाकार त्यांच्या गाण्याची कला जोपासताना दिसत आहेत. अनेक कलाकारांमध्ये असलेलं सिंगिग टॅलेंट यामुळे प्रेक्षकांसमोर आलं. या शोच्या सेटवर एकुण सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता अभिजीत केळकरसोबतचं पुर्णिमा डे, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे वाहिनीने हा शोचं शूटींग १० सप्टेंबरपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

अभिनेता अभिजीत केळकरने सोशल मिडियावर पोस्ट लिहिली आहे. त्याने म्हटलंय, 'नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोना ची लागण झाली... माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी,खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती... डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली... त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे... माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत... तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत धन्यवाद.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

...नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोना ची लागण झाली... माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी,खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती... डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली... त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे... माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत... तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत धन्यवाद...

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkarofficial) on

गायक रोहित राऊतने देखील नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.

चॅनलचे क्रिएटीव्ह डिरेक्टर अमित फाळके यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, 'या शोचं शूटींग आठवड्यातून एकदा केलं जातं तेही सगळ्या सुरक्षांच्या नियमाखाली. सुरुवातीला शो मधील दोन गुरु पॉझिटीव्ह आढळले मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणं नव्हती. त्यानंतर दोन स्पर्धकांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि सोबतंच दोन कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आम्ही नियमानुसार शूट थांबवलेलं आहे मात्र आमच्याकडे शूट केलेले काही एपिसोड्स आहेत तेव्हा शो कोणत्याही अडथळ्यांशिवाय टेलिकास्ट होईल.'  

singing star contestant abhijeet kelkar juilee joglekar and rohit raut test positive    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: singing star contestant abhijeet kelkar juilee joglekar and rohit raut test positive