सुशांतच्या चॅटमधून खुलासा- बहीण प्रियांका देत होती एंजायटी-डिप्रेशनची औषधं घेण्याचा सल्ला, वाचा चॅट

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 31 August 2020

सुत्रांच्या माहितीनुसार ८ जूनला जेव्हा रिया चक्रवर्ती सुशांतच्या घरी हजर होती तेव्हा सुशांत त्याच्या बहीणीसोबत बोलत होता. सकाळी सुमारे १० च्या आसपास सुशांत बहीण प्रियांकासोबत बोलत होता.

मुंबई- सुशांत केसमध्ये आता मोठी घडामोड समोर येत आहे. सुशांत आणि त्याची बहीण प्रियांकाच्या चॅट मधून मोठा खुलासा झाला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ८ जूनला जेव्हा रिया चक्रवर्ती सुशांतच्या घरी हजर होती तेव्हा सुशांत त्याच्या बहीणीसोबत बोलत होता. सकाळी सुमारे १० च्या आसपास सुशांत बहीण प्रियांकासोबत बोलत होता. यादरम्यान प्रियांकाने सुशांतला १ आठवड्यापर्यंत librium capsule घ्यायला सांगितल्याचा खुलासा या चॅटमधून होतोय.

हे ही वाचा: अभिनेता सुबोध भावे आणि कुटुंबाला कोरोनाची लागण

सुशांतची बहीण प्रियांकाने सुशांतसोबत चॅटमध्ये काही औषधांचा उल्लेख केला होता. या गोळीसोबतंच nexito 10mg दररोज दिवसातून एकदा घ्यायला सांगितली होती. या सर्व गोष्टी मॅसेंजरवर झाल्या होत्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांकाने सुशांतला SOS साठी Lonazep tablet सोबत ठेवण्यास सांगितलं होतं. जेणेकरुन एंजायटी अटॅक आल्यावर सुशांत लगेचच ही गोळी घेऊ शकला असता. सुशांतने प्रियांकाला सांगितलं होतं की या गोळ्यांसाठी प्रिस्क्रिप्शनची गरज लागेल. त्यानंतर प्रियांकाने लगेचच प्रिस्क्रिप्शनची अरेंजमेंट केली.

या मेसेजमधून आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की सुशांतला डॉक्टरांकडे नेण्याआधीच त्याची परिस्थिती न पाहता त्याला औषधं दिली जात होती.  सुत्रांनी सांगितलं की डॉक्टर तरुण कुमार सुशांतचे फॅमिली फ्रेंड होते. डॉक्टरांनीच या औषधांचं प्रिस्क्रिप्शन दिलं होतं. यासाठी सुशांतच्या घरातील सदस्यांसोबत चर्चा झाली होती. 

आत्तापर्यंत असं म्हटलं जात होतं की सुशांतच्या कुटुंबाला त्याच्या आजाराविषयी कल्पना नव्हती. तेव्हा हे चॅट समोर आल्यावर आता असंच दिसून येतंय की त्याच्या बहीणीला त्याच्या आजाराविषयी पूर्ण माहिती होती. सुशांतच्या कुटुंबियांनी म्हटलं होतं की रिया सुशांतला औषधं द्यायची मात्र या चॅटमधून तर याऊलटंच दिसून येतंय की प्रियांका त्याला औषधं देत होती. प्रियांका ८ जूनला सुशांतच्या संपर्कात होती. रियाने या दिवशी १२ वाजता घर सोडलं होतं तर प्रियांकाचं त्याच्यासोबत १० वाजता बोलणं झालं होतं. 

नेमकं प्रियांका आणि सुशांतमध्ये काय बोलणं झालं होतं? वाचा चॅट

प्रियांका- पहिले एक आठवड्यापर्यंत Librium घे मग नाश्त्यानंतर दररोज एकदा nexito 10 mg घे. Lonazep सोबत ठेव जेव्हा कधी एंजायटी ऍटॅक येईल तेव्हा घे.

सुशांत- ओके सोनू दी

कोणतीही औषधं प्रिस्क्रिप्शनशिवाय नाही मिळणार

प्रियांका- मला पाहून दे कुठुन मिळत असेल तर

यानंतर प्रियांकाने सुशांतला वॉईस कॉल केला होता.

प्रियांका- बाबु मला फोन कर. मला प्रिस्क्रिप्शन पाठवयाचं आहे. माझी मैत्रीण एक प्रसिद्ध डॉक्टर आहे जी तुला मंबईतील चांगल्या डॉक्टरांसोबत कनेक्ट करेल. सगळं कॉन्फिडेन्शिअल आहे. तेव्हा टेन्शन घेऊ नको. मला कॉल कर.

प्रिस्क्रिप्शनची अटॅचमेंट

प्रियांका- बाबू हे प्रिस्क्रिप्शन आहे. हे दिल्लीमधील आहे. मात्र याचा काही संबंध नसला पाहिजे. जर काही झालंच तर ऑनलाईन कंसलटेशन असं सांगू शकतो.

सुशांत- ओके. थँक्यू सो मच सोना दी.  

sushant singh rajput communicated with sister priyanka on 8th june exclusive chat  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput communicated with sister priyanka on 8th june exclusive chat