लग्नाआधीच गोड बातमी; अभिनेत्री आलीये चर्चेत

फ्रीडाने हे फोटो शेअर करत गूड न्यूज दिली आहे.
freida pinto and Cory Tran
freida pinto and Cory Tranfile image
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री फ्रीडा पिंटो (freida pinto) ‘स्‍लमडॉग मिलेनियर’ (slumdog millionaire) या चित्रपटामधील अभिनयामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. फ्रीडा ही एक भारतीय अभिनेत्री आहे. पण ती ब्रिटीश आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. फ्रीडाने नुकतेच तिच्या होणारा नवरा कॉरी ट्रॅनसोबतचे (Cory Tran) खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये फ्रीडा तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करत आहे. फ्रीडाने या फोटोमध्ये ब्लॅक कलरचा फ्लोरल ड्रेस घातला आहे. फ्रीडाने हे फोटो शेअर करत गूड न्यूज दिली आहे. सोशल मीडियावर फ्रीडाच्या फोटोला कमेंट करत सर्वांनी शुभेच्छा दिल्या.(slumdog millionaire actress freida pinto announce expecting her first child share photo and flaunts her baby bump)

फ्रीडाने कॉरी ट्रॅनसोबतचे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'बेबी ट्रॅन येणार आहे.' फ्रीडाच्या या फोटोला अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. अभिनेत्री नरगिस फाखरीने कमेंट केली ‘तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा’ तर अभिनेत्री मृणाल ठाकुरने कमेंट केली, 'फ्रीडा आणि कॉरीला खूप खूप शुभेच्छा.

freida pinto and Cory Tran
मुलीच्या पहिल्या पगारातून वडिलांना 'ट्रीट' - अनुरागची पोस्ट

2019 मध्ये झाला होता साखरपुडा

फ्रीडा आणि कॉरीचा नोव्हेंबर 2019 मध्ये साखरपुरडा झाला होता. तेव्हा फ्रीडाने कॉरीसोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना तिच्या साखरपुड्याबद्दल माहिती दिली होती. फ्रीडाने कॉरीच्या वाढदिवसादिवशी त्याच्यासोबतचा फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले होते,'आता मी खूप भावनिक झालीये. जेव्हापासून मी त्याच्याबरोबर आहे तेव्हापासून मला जीवनाचा वेगळा अर्थ समजला आहे. मी खूप आनंदी आहे.

freida pinto and Cory Tran
RRR च्या निर्मात्यांचं ठरलं, रिलीज डेट केली जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com