
मुंबई - निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (anurag kashyap) हे आपल्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांना जगभरातून प्रेक्षकवर्ग मिळतो. आगळ्या वेगळ्या प्रकारच्या दिग्दर्शनासाठी ते परिचित आहे. परखड मतांसाठीही त्यांचे नाव सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींसाठी कश्यप यांचे नाव सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाले आहेत. ते सध्या आपल्या मुलीच्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहे. (anurag kashyap daughter aaliyah kashyap gave treat after her first)
अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप (aaliya kashayap) सध्या मुंबईमध्ये वडिलांसोबत टाईम स्पेंड़ करताना दिसत आहे. तिनं सोशल मीडियावर त्याबाबत काही फोटोही शेयर केले आहेत. आलिया अजून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तिनं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेयर करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले होते. त्यावेळी तिनं आपल्या चाहत्यांना हॅकर्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले होते.
आलियानं स्वताचं एक युट्युब चॅनेल सुरु केलं आहे. त्यात तिनं आपले वडिल अनुराग कश्यप यांच्याबरोबर प्रश्नोत्तरे केली आहेत. आलियानं आपल्या पहिल्या पगारातून अनुराग यांना एक ट्रीट दिली आहे. अनुराग यांनी याबाबत एक व्हिडिओ शेयर करुन ही माहिती दिली आहे. त्या व्हिडिओमध्ये अलिया बिल देताना दिसत आहे. त्यानंतर ती अनुराग यांच्याकडे पाहते आणि हसते. त्या व्हिडिओला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.