Ganesh Chaturthi Festival 2023: स्मिता जयकर जपतायत १५० वर्षांची परंपरा! तांदळापासून बनवतात गणपती

गणेश चतुर्थीला स्मिता जयकर यांनी १५० वर्षांची परंपरा जपली आहे
Smita Jaykar preserves 150 years of tradition made lord Ganpati  from rice photo viral
Smita Jaykar preserves 150 years of tradition made lord Ganpati from rice photo viralSAKAL

स्मिता जयकर ही बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. स्मिता यांनी आजवर अनेक सिनेमांमधून लक्षवेधी भुमिका साकारल्या.

स्मिता जयकर या प्रत्येक सण - उत्सव उत्साहात साजरे करतात. स्मिता जयकर यांनी यंदा त्यांच्या घरी गणपती बसवला आहे. स्मिता यांच्याघरी १५० वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा आहे.

स्मिता जयकर यांनी त्यांच्या घरी असलेल्या गणपती उत्सवाचा फोटो शेअर केलाय. या फोटोत गणपती बाप्पाची कोणतीही मूर्ती नसुन तांदळापासून बाप्पाचं चित्र तयार केलं गेलंय.

तांदळापासुन गणपती बाप्पाची प्रतिकृती तयार केली असून त्या बाजूला समया आणि छोटे दिवे दिसत आहेत. याशिवाय नारळाच्या आकारात बाप्पाची मूर्ती दिसून येतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com