'सारांगे काकू गेल्या'; 'बिग बॉस'मधून स्नेहा गेल्यानंतर नेटकरी खूश | Sneha Wagh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sneha Wagh

'सारांगे काकू गेल्या'; 'बिग बॉस'मधून स्नेहा गेल्यानंतर नेटकरी खूश

Bigg Boss Marathi 3 बिग बॉस मराठी ३ मध्ये गेल्या आठवड्यात बरीच भांडणं, वादविवाद पहायला मिळाले. घरातील समीकरणं बदलताना दिसली. मीनल आणि गायत्री तर जय-विकासमध्ये भांडणं झाली. तर दुसरीकडे कार्यामध्ये विघ्न आणल्यामुळे मीरा आणि विशालला कारागृहाची शिक्षा भोगावी लागली. कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये गायत्री दातारने बाजी मारली. नॉमिनेशन कार्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये उत्कर्ष, दादूस, मीरा, स्नेहा, गायत्री आणि सोनाली नॉमिनेट झाले होते. रविवारच्या भागामध्ये या सदस्यांपैकी गायत्री, सोनाली सुरक्षित झाले आणि उत्कर्ष, मीरा, स्नेहा, दादूस डेंजर झोनमध्ये गेले. अखेरच्या क्षणी मीरा आणि स्नेहा डेंजर झोनमध्ये होते. स्नेहा वाघला Sneha Wagh बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर जावं लागलं. दर आठवड्यात प्रत्येक स्पर्धकाच्या एलिमिनेशननंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागतात. बिग बॉसच्या घरातून स्नेहा बाहेर पडल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे.

स्नेहा वाघ पहिल्या दिवसापासून चर्चेत होती. स्नेहा पूर्वाश्रमीचा पती आविष्कार दारव्हेकरसुद्धा बिग बॉसच्या घरात होता. एकाच छताखाली हे दोघं राहत होते. यादरम्यान स्नेहा तिच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांमध्ये चर्चेत आली. बिग बॉसच्या घरात स्नेहा आणि जय यांच्यात हळूहळू जवळीक वाढू लागली होती. या दोघांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात होतं. बिग बॉसच्या घरात स्नेहा दररोज 'कोरियन' भाषेत 'आय लव्ह यू' म्हणायची. त्यावरून तिला नेटकऱ्यांनी 'सारांगे' असं नाव ठेवलं.

हेही वाचा: 'याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार', महेश मांजरेकरांवर नेटकरी चिडले

'बरं झालं, सारांगे काकू गेल्या', असं एकाने म्हटलं. तर 'अखेर आता सारांगे बंद होईल' असं दुसऱ्याने लिहिलं. 'स्नेहा आज माहेरी गेली', असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. स्नेहा बिग बॉसच्या घरात ५० हून अधिक दिवसांपासून राहत होती.

loading image
go to top