Bigg Boss Marathi 4: उशिरा आली अन लवकर गेली.. स्नेहलता वसईकर घराबाहेर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

snehlata vasaikar eliminated from Bigg Boss Marathi 4

Bigg Boss Marathi 4: उशिरा आली अन लवकर गेली.. स्नेहलता वसईकर घराबाहेर..

bigg boss marathi 4: शनिवारच्या चावडीनंतर घरतल्या सदस्यांचं टेंशन वाढवणारा एक प्रसंग येतो तो म्हणजे एलिमिनेशन.. म्हणजेच बिग बॉस च्या घरातील एक सदस्य बाहेर होतो. सगळ्यांसाठीच हा प्रसंग भावनिक असतो. अखेर काल 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi)च्या चौथ्या पर्वातून अभिनेत्री स्नेहलता वसईकरची एक्झिट झाली.

(snehlata vasaikar eliminated from Bigg Boss Marathi 4)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: स्पर्धकांच्या माना शरमेनं खाली.. मांजरेकरांनी गोड बोलून जिरवली!

यावेळी स्नेहलता घराबाहेर जाईल असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला होता,कारण तिच्यासोबत एलिमिनेट झालेले सदस्य तिच्या तुलनेने अत्यंत तगडे होते. स्नेहलतानेही आल्यापासून उत्तम खेळ दाखवला. तिच्या बोलण्याने, तिच्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केलं होतं. उशिरा येऊन म्हणजे वाइल्ड कार्ड एंट्री घेऊनही ती उत्तम खेळली. पण चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर तिने बिग बॉस च्या घराचा निरोप घेतला. यावेळी अपूर्वा प्रचंड भावूक झाली.

बिग बॉस मठीचं घर या आठवड्यात सदस्यांनी चांगलंच गाजवलं नाही घरात धुडगूस घातला. घरात रोज राडे होतात मग ते टास्कमध्ये असो वा घरातील कामावरून असो वा सदस्यांमध्ये असो... या आठवड्यात कोणीच कोणापेक्षा कमी नव्हतं असं कुठेतरी जाणवलं... राखीचं वागणं, अक्षय - प्रसादचं भांडणं, अपूर्वा विकासची खडाजंगी, प्रसाद - अमृतामध्ये झालेली बाचाबाची असो किरण माने आणि अमृता धोंगडे मध्ये झालेले कडाक्याचे भांडणं असो... हा आठवडा सदस्यांनी गाजवला...

BB Highschool नंतर भरलेल्या BIGG BOSS च्या चावडीत महेश मांजरेकर प्रत्येक सदस्यची शाळा घेणार असे वाटत असताना सरांनी गोड शब्दांत सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या. तर बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे किरण मानेंना अमृता धोंगडेची चुगली आली. ते म्हणाले, मला असं वाटतं अमृताच्या बाबतीत विकासने जे ओळखलं होतं ते आता मला बरोबर वाटू लागलं आहे. मी विकासाची भांडून कायम अमृताची बाजू घ्यायचो. विकास मी तुझचं ऐकायला हवं... त्यावर अमृता म्हणाली, तुमच्यात जो तिसरा माणूस येईल तो मूर्ख आहे खरतर. त्यामुळे मी माफी मागते.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi