अक्षय कुमारचा मिशन मंगल सोशल मिडियावर बॉयकॉट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 August 2019

अभिनेता अक्षय कुमार सामाजिक संदेश देणारे आणि देशभक्तीपर चित्रपट मिशन मंगल नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या चित्रपटांना भरघोस यशही मिळत असतानाचा ट्विटरवर  #BoycottMissionMangal असा ट्रेंड सुरु झाला आहे. भारताच्या मंगळ मोहिमेची वास्तववादी कथा मांडणारा'मिशन मंगल' हा चित्रपट नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

अभिनेता अक्षय कुमार सामाजिक संदेश देणारे आणि देशभक्तीपर चित्रपट मिशन मंगल नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या चित्रपटांना भरघोस यशही मिळत असतानाचा ट्विटरवर  #BoycottMissionMangal असा ट्रेंड सुरु झाला आहे. भारताच्या मंगळ मोहिमेची वास्तववादी कथा मांडणारा'मिशन मंगल' हा चित्रपट नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
 
कॉलमनिस्ट आणि लेखक संजय दिक्षित यांच्या पोस्ट नंतर याची सुरवात झाली. दिक्षित यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात इस्लामिक धर्मप्रचारक बनला आहे. मंगलायान मोहिमेत मुख्य भुमिका पार पाडणाऱ्या शास्त्रज्ञेचा मुलगा इस्लाममध्ये धर्मांतर करत आहे. त्याने बिअर्ड ठेवली आहे, नमाज  पठन करत आहे, आणि गणपतीला मानत नाही. हिंदुचे नकारात्मक चित्रण केले आहे.

दिक्षित यांचे हे टि्वट व्हायरल झाले. चित्रपट न पाहताच लोकांनी हे ट्विट शेअर केले आणि त्यासोबत #BoycottMissionMangal हा ट्रेंड सुरु झाला. दिक्षित यांच्या ट्विटनुसार एका डॉयलॉगची थट्टा केली आहे. अक्षय कुमारसह चित्रपटातील इतर कलाकरांनी या ट्विटवर अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. ताप्सी पन्नुला देखील  चित्रपाटातील एका सीनसाठी ट्रोल केले आहे.

"मिशन मंगल' हा चित्रपट भारतीय वैज्ञानिकांची यशाची गाथा सांगणारा आहे. भारताच्या मंगळ मोहिमेची वास्तववादी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो)चे शास्त्रज्ञ आणि इंजिनियर यांना सलाम करणारा हा चित्रपट आहे. बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने चांगला बिझनेस केला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने  29.16 करोडची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 17.28 करोडची कमाई केली. दोन्ही दिवसांची एकुण कमाई 46.44 करोड एवढी झाली आहे. 

बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरत असला तरी सोशलमिडियावर मात्र ट्रोल होत आहे. मात्र, सोशल मिडियाच्या या #BoycottMissionMangal या ट्रेंडमुळे चित्रपटाच्या बिझनेसवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social Media asks to boycott Akshay Kumar latest movie Mission Mangal