'ही' तर आहे कतरिनाची डुप्लिकेट !

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

कतरिनासारखी हुबेहुब दिसणारी एक मुलगी समोर आली आहे. सध्या तिची चर्चा सोशल मीडियावर चालू आहे. 

मुंबई : आपल्या सारखीच हुबेहुब दिसणारी व्यक्ती असणे म्हणजे एका प्रकारचं आश्चर्य म्हणावं लागेल. बॉलिवूडमध्ये देखील अनेक कलाकारांसारखी हुबेहुब व्यक्ती सापडली आहे. ऐश्वर्या रॉय, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, जॅकलीन यांच्यासारख्या दिसणाऱ्या डुप्लिकेट आहेत. याआधी कतरिनासारखी दिसणारी झरीन खान हिचीदेखील चर्चा होती. आता मात्र कतरिनासारखी हुबेहुब दिसणारी एक मुलगी समोर आली आहे. सध्या तिची चर्चा सोशल मीडियावर चालू आहे. 

इंटरनेटवर व्हायरल होत असलेली अलीना राय ही टिक टॉक सेंसेशन आणि फॅशन ब्लॉगर आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो पाहिल्यावर लक्षात येते की ती हुबेहुब कतरिनासारखीच दिसते. ती सध्या मुंबईत राहते. अलिना कतरिनासारखी दिसत असल्याने तिच्या फोटोंना भरपूर लाईक आणि कमेंट पाहायला मिळतात. फॅशन ब्लॉगर असलेल्या अलिनाचे इन्स्टाग्राम अकाउंटवर 32 हजारांहून जास्त फोलोअरस् आहेत. 

सध्या अलिना इंटरनेटवर चर्चेत असल्याने नेटकऱ्यांनी तिचे आणि कतरिनाचे फोटो कोलाज करुन अपलोड केले आहेत. तिचे फोटो पाहून अनेकजण 'सिंग इज ब्लिंगवाली कतरिना' अशी कमेंट करत आहेत. सर्वंचजण तिचं कौतुक करताना दिसत आहेत. तर एका युजरने कमेंट केली आहे, 'तुझे फोटो सलमान खानपर्यंत पोहोचायला हवेत'. 

कतरिना कैफ सध्या तिचा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social media found the look-alike of Katrina kaif