Social Media Influencers : 'आमचं दुखणं अवघड जागेचं, कुणाला बोलता येईना, बॉलीवूडवाले आम्हाला फक्त....'!

शेवटी काय बॉलीवू़डमधील लोकं ती.. त्यांनी त्यांना जेवढा स्क्रिन टाईम द्यायचा त्यापेक्षा कमीच दिला. अन् वेगळयाच चर्चेला सुरुवात झाली.
Social media influencers change role only for promotion
Social media influencers change role only for promotion esakal

Social media influencers change role only for promotion : आता झालं असं की, दिवसेदिवस सोशल मीडियावर त्या लोकांची संख्या वाढत चालली. त्यांचा फॅन क्लबही वाढतो आहे. त्यांना बॉलीवूडवाल्या लोकांनी हात दिला. त्यांची मदत घेतली. आणि त्यांचा फायदा घेत स्वताच्या चित्रपटांचे प्रमोशनही करुन घेतले. शेवटी काय बॉलीवू़डमधील लोकं ती.. त्यांनी त्यांना जेवढा स्क्रिन टाईम द्यायचा त्यापेक्षा कमीच दिला. अन् वेगळयाच चर्चेला सुरुवात झाली.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण डॉली सिंगनं २०२० मध्ये आलेल्या भाग बिनी भागमध्ये तर प्राजक्ता कोळीनं २०२२ मध्ये आलेल्या जुक ज्यो तो कुश कपिलामध्ये भूमिका केली होती. सुखेर आणि सृष्टी दीक्षित यांना द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये भूमिका मिळाल्याचे दिसून आले. या सोशल मीडिया इन्फ्ल्युंअर्सची खंत अशी आहे की, त्यांना फक्त बॉलीवूडच्या निर्मात्यांनी स्वताच्या फायद्यासाठी चित्रपटामध्ये संधी दिली. संधी दिली ही चांगली बाब पण तेवढी स्पेस स्क्रिनवर मिळणं गरजेचे होते तेवढी ती काही मिळालेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील इन्फ्ल्युंअर्सची भूमिका आणि त्यांची जबाबदारी थोडी बदलताना दिसते आहे. त्यांना असणारी फॉलोइंग लक्षात घेऊन अनेक जण त्यांच्याकडून चित्रपटाचे प्रमोशन करुन घेतात. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन मुलाखती शेयर करतात. जेणेकरुन संबंधित चित्रपटाला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळावा. आता तर वेगवेगळ्या टीव्ही शो वर, कॉमेडी शो मध्ये, रियॅलिटी शो मध्ये या लोकांना बोलविण्यात येते. याबाबतची सविस्तर परिस्थिती स्पष्ट करणारे वृत्त हिंदूस्थान टाईम्सनं दिले आहे.

या इन्फ्ल्युअंर्स कोणतीही मोठी भूमिका दिली जात नाही. त्याचे कारण त्यांनी विचारले आहे. आता यावर सोशल मीडियातूनही वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहे. यावर प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मनोज रोमोला म्हणाले की, माझ्याकडे कित्येक फिल्ममेकर्स हे त्यांना सोशल मीडिया इनफ्ल्युंअर्स हवे आहेत म्हणून येतात. त्यांना बाकी काही नको फक्त सोशल मीडियावर प्रसिद्धी हवी असते.

निर्मात्यांना त्यांचे चित्रपट, मालिका यांचे प्रमोशन करायचे असते. त्यासाठी ते त्यांना निमंत्रित करतात. तुम्ही त्यांना तुमच्या म्युझिक व्हिडिओमध्ये देखील कास्ट करता. पण त्यांच्याकडे एका अर्थानं दुर्लक्षही करता. तुम्ही जर त्यांना मोठी संधीच दिली नाही तर त्यांच्याकडून मोठ्या भूमिका कशा काय होणार हा प्रश्न आहे. भविष्यात त्यांना कुणीही अॅक्टर म्हणून घेणार नाही. त्याची काही कारणं आहेत.

Social media influencers change role only for promotion
Nana Patekar : नाना पाटेकरांच्या घरी ऋषी कपूर दारुची बाटली घेऊन गेले होते तेव्हा....! काय होता तो भन्नाट किस्सा?

प्रेक्षक जेव्हा थिएटरमध्ये जातात तेव्हा त्यांना त्यांच्या आवडीचा कलाकार पाहायचा असतो. ते काही एखाद्या सोशल मीडिया इन्फल्युअंर्सला पाहण्यासाठी थिएटर्समध्ये जात नाहीत. लोकं थिएटरमध्ये जातात कारण त्यांना त्यांच्या हिरोकडून काही चमत्कार हवा असतो. तो त्यांच्यादृष्टीनं एक महत्वाची भूमिका पार पाडतो. असेही रोमोला यांनी यावेळी सांगितले.

Social media influencers change role only for promotion
Jawan Free Ticket Offer: लोभी जवान! कमाई वाढवण्यासाठी चाहत्यांना दिली भन्नाट ऑफर!

फिल्ममेकर अकर्ष खुराणा म्हणाले की, मी जेव्हा मिसमॅच्ड मध्ये प्राजक्ताला कास्ट केले होते. त्यावेळी त्या मालिकेला मिळालेला प्रतिसादही मोठा होता. पण जेव्हा तुम्ही सर्वात मोठ्या सोशल मीडिया इन्फ्ल्युअंर्सला तुमच्या चित्रपटात संधी देता तेव्हा तुम्हाला प्रेक्षक मिळेल याचीही काही खात्री नसते. कारण रिल्स किंवा तत्सम एखाद्या व्हिडिओमध्ये त्यांना पाहणे आणि चित्रपटात अथवा मालिकेमध्ये पूर्णवेळ पाहणे यात खूप फरक दिसून येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com