esakal | Video: राणु बाईंनी गायलं 'Manike Mage Hithe'
sakal

बोलून बातमी शोधा

Video: राणु बाईंनी गायलं 'Manike Mage Hithe'

Video: राणु बाईंनी गायलं 'Manike Mage Hithe'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सोशल मीडियावर आपल्या गायकीनं प्रसिद्ध झालेल्या राणु मंडल यांचं पुन्हा एक नवीन गाणं व्हायरल झालं आहे. त्याला नेहमीप्रमाणे प्रेक्षकांचा, नेटकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियामुळे राणु या सेलिब्रेटी झाल्या. त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली. एवढचं नाही तर त्यांना वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये देखील बोलावण्यात आले होते. आपल्या आवाजानं त्यांनी मोठा चाहतावर्ग गोळा केला. काही गायकांनी तिला आपल्या अल्बममध्ये देखील स्थानं दिलं. अशा राणु मंडल यांना अमाप लोकप्रियता मिळाल्याचे दिसून आले आहे. आता त्यांनी मनिके मागे हिथे नावाचे गाणे गायले आहे. त्याला चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या वेगानं राणु यांना प्रसिद्धी मिळाली त्याच वेगानं त्या प्रसिद्धीझोतापासून लांबही गेल्याचे दिसून आले आहे.

आता पुन्हा एकदा राणु या चर्चेत आल्या आहेत. त्याचे कारण सध्याच्या घडीला लोकप्रिय झालेलं Manike Mage Hithe गाणं त्यांनी गायलं आहे. त्या व्हिडिओमध्ये रेड कलरचं टी शर्ट घालून त्या गाणं म्हणत आहे. काहींना राणु यांचा उत्साह वाढवला आहे तर काहींनी त्यांना ट्रोलही केलं आहे. पुन्हा लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर हे गाणं गायलं आहे. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया त्यांना आल्या आहेत. काहींनी त्यांच्या समर्थनार्थ कमेंट केली आहे. अशाप्रकारे एखाद्याला जज करु नये असे त्यांनी म्हटले आहे.

Manike Mage Hithe हे एक सिंहली भाषेतलं गाणं आहे. जे गाणं श्रीलंकेतील गायिका वाली योहानीनं गायलं आहे. त्या गाण्याला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावरही त्या गाण्याची लोकप्रियता प्रचंड आहे. 28 वर्षाच्या योहानीनं गायलेल्या त्या गाण्याचं सर्वांनी कौतूक केलं आहे. तिनं काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमध्ये डेब्यु केला आहे. योहानीनं आपलं पहिलं गाणं शिद्दत या चित्रपटासाठी गायलं आहे. राणु मंडल यांच्याविषयी सांगायचं तर आता त्यांच्यावर एक बायोपिक येणार आहे. त्याचे नाव मिस राणू मारिया असं आहे.

loading image
go to top