esakal | सलमानच्या चित्रपटात असतं काय? सोफिया म्हणाली, राधे म्हणजे...
sakal

बोलून बातमी शोधा

actress sofiya hayat

सलमानच्या चित्रपटात असतं काय? सोफिया म्हणाली, राधे म्हणजे...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कमाल राशिद खान (kamal rashid khan) नंतर आता अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयात देखील सलमान खानच्या राधेवर टीका केली आहे. तिनं त्याच्या राधे चित्रपटाविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सलमाननं कमाल खानवर कोर्टात तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे कमाल खान वेगवेगळ्या प्रकारे सलमानवर टीका करताना दिसत आहे. (sofia hayat slams salman khan says watching the trailer of radhe is like i have not seen all of this before)

सध्या सोफिया सोशल मीडियावर (social media) चर्चेत आली आहे. तिनं एक पोस्ट (post) शेअर केली आहे. त्यात तिनं राधेवर सडकून टीका केली आहे. सोफियानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, सलमान दरवेळी एकाच प्रकारचे प्रयोग करत असतो. त्याचे चित्रपट ईदच्याच वेळी प्रसिध्द होतात. सण उत्सवांचा उपयोग तो आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी करत असल्याचे दिसून आले आहे. त्यातून तो पैसाही कमवतो. मात्र त्याच्या चित्रपटांमधील स्टोरी ही एकसारखीच असल्याचे दिसून आले आहे.

सलमानवर (salman khan) टीका करताना सोफियानं लिहिलं आहे की, तो दरवेळी त्याच्यापेक्षा लहान अभिनेत्रींना कास्ट (casting) करतो. तो त्याच्या वयाच्या अभिनेत्रींना का घेत नाही. त्यानं स्वतच्या विकासासाठी काही केलं नाही. मात्र त्याला आता कळायला पाहिजे की प्रेक्षकांना आता सगळ्या गोष्टी समजतात. आणि ते एकाच प्रकारच्या स्टोरीज पाहून कंटाळले आहेत. राधेचा ट्रेलर पाहिल्यावर मला असे वाटले नाही की मी काही नवीन पाहिले आहे. मला त्यात नवीन काही दिसलचं नाही.

हेही वाचा: The Family Man 2: मनोज वाजपेयीचं तगडं मानधन; जाणून घ्या इतर कलाकारांचीही फी

हेही वाचा: शेखर संजनाला मुंबईला घेऊन जाणार?;पाहा व्हिडिओ

सोफियानं लिहिलं आहे की, रणदीप हुडानं चांगला अभिनय केला आहे. तो एक चांगला अभिनेता आहे. मात्र या चित्रपटाचे लेखन एवढे प्रभावी नाही. त्यामुळे त्याच्या अभिनयाला मर्यादा आहेत. त्याला कदाचित सलमान खान सोबत काम करायचे असल्यानं त्यानं अशा प्रकारची भूमिका केली का, असा सवालही सोफियानं विचारला आहे.