सोहा अली खान म्हणतेय की,"वाघ पाहिलेत का असा प्रश्न विचारू नका तर विचारा किती वाघ पाहिले?''-Entertainment News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Soha Ali Khan-Kunal Khemu
#Sohaalikhan#kunalKhemu#Tadobanationalpark#videoviral#

ताडोबाच्या जंगलात पोहोचली सोहा अली खान!

sakal_logo
By
प्रणाली मोरे

सोहा अली खान(Soha Ali Khan) नेहमीच तिच्या सोशल मीडियावरून बरेच फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करीत असते. कधी मग ते तिच्या लहान मुलीसोबत असतात ,कधी तिचा पती कुणाल खेमूसोबत(Kunal Khemu) तर कधी तिच्या हॉलिडेजचेदेखील असतात. सध्या सोहा अली खान तिच्या कुटुंबियांसोबत पोहोचलीय ताडोबाच्या जंगलात. तिथे तिने जंगल सफारी एन्जॉय करतानाचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरनं शेअर केले आहेत. 'ताडोबा नॅशनल पार्क' हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं आणि मोठं नॅशनल पार्क आहे. हे नॅशनल पार्क 'ताडोबा अंधारी टायगर रीझर्व्ह' (Tadoba Andhari Tiger Reserve) या नावानंही ओळखलं जातं. या जंगलात तब्बल 47 वाघ आहेत. नागपूर शहरापासून ताडोबा नॅशनल पार्क हे 150 किलोमीटर अंतरावर आहे.

हेही वाचा: कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले

सोहासोबत ताडोबाच्या जंगलात तिचा पती कुणाल खेमू आणि मुलगी इनाया नौमी खानही जंगल सफारी एन्जॉय करण्यासाठी गेले आहेत. जंगल सफारी एन्जॉय करतानाचा फोटो पोस्ट करून आपण ही सफारी एन्जॉय करीत असल्याचं तिनं म्हटलंय. ताडोबाच्या जंगलातील फोटोची सिरीज पोस्ट करून तिनं त्या फोटोजना कॅप्शन दिलंय की,"वाघ पाहिलेत का असा प्रश्न विचारू नका तर विचारा किती वाघ पाहिले?''. पहिल्या फोटोत सोहा,कुणाल आणि इनाया जंगलात राईडसाठी नेणा-या जीपमध्ये बसलेले दिसत आहेत. दुस-या फोटोत फायनली म्हणत वाघाच्या पायाचे ठसे सोहाने कॅमे-यात कैद केलेले दिसून येत आहेत. तर जंगलात गेल्यानंतर ज्या क्षणाची प्रत्येकजण प्रतिक्षा करतो त्या क्षणाला सोहानं कॅमे-यात बंदिस्त केलं आहे. तो क्षण म्हणजे वाघोबाचं दर्शन. त्यांच्या सफरी राईडचा तिने पोस्ट केलेला व्हिडीओही पाहण्यासारखा आहे.

कुणाल आणि सोहा नेहमीच अशा प्रकारच्या हॉलिडेच्या माध्यमातून एकमेकांना वेळ देत फॅमिली टाईम एन्जॉय करताना दिसतात. हे दोघे 2009 मध्ये 'ढूंढते रह जाओगे' या सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. मात्र तेव्हा ते एकमेकांशी फार बोलायचे नाहीत. पण त्यांचा दुसरा सिनेमा '99' च्या सेटवर दोघांमध्ये सूत जुळून आलं आणि मग पॅरिसमध्ये कुणालने सोहाला अतिशय रोमॅंटिक पद्दतीने लग्नासाठी प्रपोज केलं. त्यानंतर 2015 मध्ये कुणाल आणि सोहाने लग्नगाठ बांधली. 2017 मध्ये या दोघांच्या घरी इनाया ही गोंडस मुलगी जन्माला आली.

loading image
go to top