esakal | सई ताम्हणकर चाहत्यांना देणार सरप्राईज, पोस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
sakal

बोलून बातमी शोधा

sai tamhankar

सोशल मिडियाच्या माध्यामातून सई चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. नुकतीच सई पुन्हा एकदा तिच्या काही पोस्टमुळेचर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सई ताम्हणकर चाहत्यांना देणार सरप्राईज, पोस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या स्टाईल आणि हटके लुकमुळे ओळखली जाते. सई सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असते. हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ती अनेकदा चर्चेत राहिली आहे. असेच काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो व्हायरल झाल्याने सई काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर चर्चेत आली होती. सोशल मिडियाच्या माध्यामातून ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. नुकतीच सई पुन्हा एकदा तिच्या काही पोस्टमुळेचर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हे ही वाचा:  फराझ खानच्या मदतीला धावला सलमान खान, चाहत्यांनी भाईजानचं केलं कौतुक    

सईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्टर शेअर केलं आहे. 'लवकरच काहीतरी नवीन तुमच्या भेटीला येणार' असल्याचं तिनं या पोस्टमधून सांगितलं आहे. परंतु ते नेमकं काय आहे याची उत्सुकता सर्व चाहत्यांना लागली आहे. याबद्दल अनेक तर्कवितर्क देखील लावले जाताना दिसतायेत.

मात्र काही वेळापूर्वीच तिने पुन्हा एका या पिंक कलरच्या बॅकग्राऊंटवर गुलाबाचं फुल असलेलं पोस्टर शेअर केलंय यासोबत तिने 'नवीन सुरुवात' असं लिहिलंय. 

याशिवाय आधी एका पोस्टमध्ये तिने काहीही न लिहिता फक्त ब्लँक पोस्ट शेअर केली होती. यात पिंक कलरचं बॅकग्राऊंड दिसत होतं. आता या पोस्टचा नेमका अर्थ काय असाही प्रश्न सर्वांना पडला आहे.

सई चाहत्यांना लवकरच काहीतरी सरप्राईज देणार आहे हे मात्र नक्की आहे. येणाऱ्या काळात त्याचाही उलगडा होईलच. सईच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती लक्ष्मण उतेकर यांच्या 'मिमी' या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कृती सेनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका असणार आहेत. हा सिनेमा मराठीतील 'मला आई व्हायचंय' या सिनेमावर आधारीत आहे.  

something new coming soonsai tamhankarposted on instagram