'कौन बनेगा...'मधील रामायणामुळे सोनाक्षी ट्रोल!

sonakshi sinha troll on social media for no answering ramayana question in KBC
sonakshi sinha troll on social media for no answering ramayana question in KBC

नवी दिल्ली : आपण बघतो कौन बनेगा करोडपतीमध्ये अनेक अवघड उत्तरांचा सामना करून सामान्य माणूस एक करोड रूपये जिंकून जातो. पण कधी इतके साधे प्रश्न येतात आणि त्याची उत्तरं देणंही काही स्पर्धकांना अवघड जातं... असंच काहीसं घडलंय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत! ज्या प्रश्नाचं उत्तर लहान मुलालाही देता आलं असतं, ते ही उत्तर सोनाक्षीला देता आलं नाही. त्यामुळे ती सोशल मीडियात जोरदार ट्रोल होतीये...

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'चा शुक्रवारी (ता. 20) कर्मवीर हा विशेष भाग होता. यात रूमा या स्पर्धकासह सोनाक्षी सिन्हाही हॉटसीटवर होती. रूमा ही राजस्थानातील फॅशन डिझायनर असून तिने अनेक महिलांना रोजगार दिला आहे. सोनाक्षी सिन्हाचेही फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर झाले असून तिला रूमासोबत हॉटसीटवर आमंत्रित करण्यात आले होते.

सोनाक्षी व रूमाला 12 लाख 50 हजारांचा एक सोपा प्रश्न विचारला गेला पण त्या दोघींनाही त्याचे उत्तर आले नाही. रामायणातील हा प्रश्न असा होता की 'हनुमानाने संजीवनी बुटी कोणासाठी आणली होती?' त्याचे पर्याय होते सुग्रीव, लक्ष्मण, सीता, राम... या प्रश्नानंतर चर्चा करून या दोघींनी लाईफ लाईन घ्यायचा विचार केला. त्यांनी 'एक्सपर्ट ऑपिनियन' ही लाईफलाईन घेतली. ही त्यांची शेवटची लाईफ लाईन होती. यापूर्वीच्या प्रश्नांना त्या दोघींच्या सर्व लाईफ लाईन संपल्या होत्या. एक्सपर्टच्या उत्तरानुसार लक्ष्मण हे उत्तर त्यांनी लॉक केलं व 12 लाख 50 हजार जिंकल्या. 

या सर्व प्रकरणामुळे सोनाक्षीच्या बुद्धिमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. सोनाक्षीच्या बंगल्याचे नाव रामायण आहे, तर तिच्या घरातील सदस्यांची नावंही रामायणातील देव-देवतांच्या नावावरून आहेत. इतकं सगळ असूनही सोनाक्षीला रामायणातील इतका सोपा प्रश्न कसा आला नाही हा प्रश्नच उभा राहतो.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com