
मराठी कलाकार हे आता फक्त मराठी नाटक,मालिका,सिनेमांपुरतेच मर्यादित राहिले नाहीत तर ते आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीतही आपलं नाणं खणखणीत वाजवत आहेत. हिंदी सिनेमात मराठी कलाकार लीड भूमिका साकारत नसले तरी त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे सिनेमाचं बॉक्सऑफिसवरचं पारडं मात्र जड झालंय एवढं नक्की. पणआजही आपल्या हिंदी निर्मात्यांना मराठी कलाकारांची आठवण ही ब-याचदा हिंदी सिनेमात मराठी बाजाची भूमिका असली तरच येते अन्यथा त्यांचा समज असतो की मराठी कलाकार हिंदी-इंग्रजी फारसं चांगलं बोलूच शकत नाहीत. आता हे सगळं सांगायचं कारण की आपल्या मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीला यासंदर्भातलाच एक अनुभव आला होता,जो तिने एका मुलाखती दरम्यान शेअर केला आहे.
त्याचं झालं असं की,एकदा सोनाली कुलकर्णी एका हिंदी निर्मात्याकडे म्युझिकल शोच्या ऑडिशनसाठी गेली होती. तेव्हा तिचं सफाईदार इंग्रजी ऐकून त्या हिंदी निर्मात्याने विचारलं,'तू मराठी आहेस तर तू इतकं छान इंग्रजी कसं काय बोलू शकतेस?' पुढे तो म्हणाला की, 'मला वाटत होतं की बरेच मराठी कलाकार इतकं छान इंग्रजी बोलू शकत नाहीत. पण तू माझा समज चुकीचा ठरवलास'. सोनाली पुढे म्हणाली की तेव्हा तिनं ती गोष्ट खूप सकारात्मक पद्धतीनं घेतली होती. आणि मला आशा आहे की आता हिंदी इंडस्ट्रीतल्या लोकांचं मराठी कलाकारांकडे बघायचा दृष्टीकोन बदललेला असावा.
सोनाली कुलकर्णीचे नुकतेच दुबईतील चार्टर्ड अकाऊंटंट कुणाल बेनोडेकरशी लग्न झालं आहे. लग्नानंतर तिचे 'झिम्मा' आणि 'पांडू' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. तिचं लग्न तिला फारच लकी ठरलं असं म्हणावं लागेल कारण या दोन्ही सिनेमांनी बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. सोनाली आता संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा' या सिनेमात काम करीत आहे. या सिनेमात तिच्यासोबत सचित पाटील मुख्य भूमिकेत आहे. सोनाली कुलकर्णीने 'नटरंग','हम्पी','अजिंठा','हिरकणी','क्लासमेट','झपाटलेला २','मितवा','बकुळा नामदेव घोटाळे' अशा अनेक मराठी सिनेमातनं काम केलं आहे. तर 'ग्रॅंड मस्ती' या हिंदी सिनेमातही तिने रीतेश देशमुखसोबत काम केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.