''विकी-कतरिनाच्या लग्नाचे फोटो पुरे आता,जरा माझा फोटोही पहा''

सोशल मीडियावर सध्या 'या' अभिनेत्रीच्या फोटो कॅप्शनची होतेय जोरदार चर्चा...
Vicky Kaushal, Katrina Kaif
Vicky Kaushal, Katrina KaifGoogle

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा होत होती ते विकी कौशल आणि कतरिना कैफचं लग्न पार पडलं एकदाचं. रॉयल राजस्थानमध्ये पार पडलेलं हे शाही लग्न उपस्थितांच्या डोळ्यांचं पारण फेडणारं ठरलं. काल रात्री उशिरा विकी-कतरिनाच्या लग्नाचे चार-पाच फोटो सोशल मीडियावर शेअर झाले अनं एकापाठोपाठ एक सगळे त्या फोटोंवर तुटून पडले. लग्नाच्या लाल रंगाच्या जोड्यातील कतरिनाचं आरसपानी सौंदर्य आणि राजबिंडा शोभणारा विकी कौशल यांनी त्यांच्या चाहत्यांना आपल्या लग्नाची झलक फोटोतून दाखवत एक छान गिफ्टच दिलं म्हणायचं.

आता विकी-कतरिनाच्या लग्नाचे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांचं मन काही लवकर भरणार नाही हे मात्र खरंय. पण यामुळे इतर सेलिब्रिटींचे मात्र वांदे झालेत. कारण या दोघांचे फोटो पाहण्यात चाहते इतके मग्न आहेत की त्यांचं इतर कोणत्या सेलिब्रिटींकडे लक्षच नाहीय. म्हणूनच न राहवून शेवटी अभिनेत्री अनन्या पांडेनं आपला गुलाबी रंगाच्या गाऊनमधला फोटो शेअर करीत म्हटलंय की,''मला माहीत आहे सर्वजण सध्या विकी-कतरिनाच्या लग्नाचे फोटो पाहत असाल पण हाय" हे लिहिण्यामागे तिला म्हणायचंय की जरा 'माझाही फटो पहा'. शेवटी तिच्या या हटके कॅप्शनमुळे चाहत्यांना तिच्या फोटोची दखल घ्यावी लागलीच.

Vicky Kaushal, Katrina Kaif
''मला विश्वास नाही बसत की तू माझ्याबाबतीत असं काही पोस्ट करू शकतेस''

अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर तिच्या वडीलांची एकेकाळची नायिका निलम कोठारी-सोनीनं 'सो प्रिटी' म्हटलंय. तर अभिनेत्री मृणाल ठाकूरनं कॅप्शन सुंदर दिलंय म्हणून अनन्याचं कौतूक केलंय. अनन्यानं पोस्ट केलेला गुलाबी रंगाचा फोटो हा तिने ओटीटी फिल्मफेअर अॅवॉर्ड्सला जाताना काढला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com