esakal | एका तासात खरेदी, १५ मिनिटांत लग्न; सोनाली कुलकर्णीचा अनोखा विवाहसोहळा
sakal

बोलून बातमी शोधा

Sonalee Kulkarni

एका तासात खरेदी, १५ मिनिटांत लग्न; सोनाली कुलकर्णीचा अनोखा विवाहसोहळा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी Sonalee Kulkarni हिने कुणाल बेनोडेकरशी Kunal Benodekar लग्नगाठ बांधली आहे. वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. विशेष म्हणजे अत्यंत साध्या पद्धतीने सोनाली आणि कुणाल विवाहबद्ध झाले. (sonalee kulkarni tied knot with kunal benodekar )

सोनालीची पोस्ट-

'अब से हम '७' 'मे'. आम्ही जूनमध्ये युकेला लग्न करणार होतो. युकेमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तारीख पुढे ढकलावी लागली. मग लग्नस्थळाच्या उपलब्धतेनुसार जुलैमधली तारीख ठरली. लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शॉपिंग संपवून दुबईला आले आणि भारतात दुसरी लाट आली. मी फक्त पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्नबंधनातही. एप्रिलमध्ये युकेने भारतीयांसाठी प्रवासाची बंदी जाहीर केली. जुलैपर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून क्वारंटाइन, प्रवासाची बंधने, कुटुंबीयांसाठी असणारी रिस्क, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकारचे नियम या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भलामोठा लग्नसमारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला. जूनचं जुलै होतंय, म्हटलं पुढे ढकलण्याऐवजी जुलैचं मे मध्ये लग्न करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ.'

'आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहित नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून लग्न जास्त महत्त्वाचं आहे ना की समारंभ. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रिटी करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी यासारखं भाग्य नाही. आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणालचे लंडनला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही. आताच शिक्का मोर्तब करून टाकू. दोन दिवसांत सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांमध्ये चार लोकांच्या साक्षीने मंदिरात (इथे कोव्हिड निर्बंधांमुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळा, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून (लग्नाच्या मान्यतेसाठी मंदिराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) मॅरेज सर्टिफिकेटवर स्वाक्षरी केली. पुढे जेव्हा, जिथे, जसं शक्य होईल, तेव्हा, तिथे, तसं, कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबत सगळ्या विधींसह आमची ड्रीम वेडिंग करूच,' अशी पोस्ट तिने लिहिली.'

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दुबईतच सोनाली आणि कुणालचा साखरपुडा पार पडला. सोनालीचा पती कुणाल हा लंडन इथला असून कामानिमित्त तो दुबईत वास्तव्यास असतो.