Sonali Phogat च्या पतीची हत्या आणि KRK चे शॉकिंग दावे, पुन्हा होत आहेत Viral KRK | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonali Phogat Husband mrder krk urge goa police to ask sudhir sangwan about sanjay phogat

Sonali Phogat च्या पतीची हत्या आणि KRK चे शॉकिंग दावे, पुन्हा होत आहेत Viral

KRK :कमाल राशिद खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बराच चर्चेत असतो. त्यानं २०२० मध्ये केलेल्या एका ट्वीटनं त्याला आता अडचणीत टाकलं आहे. जसा तो मुंबई एअरपोर्टवर पोहोचला तसं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लवकरच त्याला बोरीवलीच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि पुढील कारवाईला सुरुवात केली जाईल. ही सध्याची KRK बाबतीतली ताजी अपडेट आहे. आता थोडं बोलूया त्याच्या सोनाली फोगाट यांच्या पतीच्या निधनानंतर केलेल्या ट्वीटविषयी,ज्यामध्ये त्यांने स्वतःच्या विचारांची मुक्ताफळं उधळली होती.(Sonali Phogat Husband mrder krk urge goa police to ask sudhir sangwan about sanjay phogat)

हेही वाचा: फेअरीटेल लव्हस्टोरी,मग लग्न आणि अचानक घटस्फोट; आमिर अली चुप्पी तोडत म्हणाला...

सोनाली फोगाट(Sonali Phogat) यांचा मृत्यू २२ ऑगस्ट रोजी गोव्यात झाला आहे. सुरुवातीला त्यांच्या मृत्यूचं कारण हार्टअटॅक असं सांगण्यात आलं. पण त्यानंतर बोललं गेलं की त्यांची हत्या झाली आहे. पोलिसांनी या केसमध्ये सोनाली फोगाट यांच्या PA सोबतच अन्य दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांचा या प्रकरणात तपास सुरू आहे. ठीक ६ वर्ष आधी २०१६ मध्ये सोनाली फोगाट यांच्या पतीची हत्या झाली होती. त्यांचा मृतदेह एका फार्महाऊस जवळ मिळाला होता.

आता KRK ने २७ ऑगस्टला एक ट्वीट केलं होतं. त्यानं लिहिलं होतं की,''मला विश्वास आहे जर गोवा पोलिस सुधीर सांगवानला(सोनाली फोगाट यांचा पोलिसांच्या ताब्यात असलेला PA)सोनाली फोगाटच्या पतीच्या गूढ मृत्यूविषयी चौकशी करतील, तर तो खरं काय ते बोलेल. आणि यानंतर पूर्ण कहाणी जगासमोर येईल''.

KRK Old Tweet Viral on sonali Phogat's Husband murder

KRK Old Tweet Viral on sonali Phogat's Husband murder

पोलिसांनी सोनाली फोगाट यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांना अटक केली आहे,त्यांनी आपला गुन्हा कबूलही केला आहे. त्यांनी सांगितलं आहे की,त्यांनीच मिळून सोनाली फोगाटला पाण्यात ड्रग्ज मिसळून प्यायला दिलं. अर्थात याबाबतील अजूनही तपास सुरू आहे आणि पोलिस एकदम कडक पावलं याबाबतीत उचलताना दिसत आहेत.

हेही वाचा: KBC: जया बच्चन यांच्यावर स्पर्धकाचा भलताच प्रश्न,अमिताभनाही सुचेना बोलावे काय

सोनाली फोगाट यांनी बिग बॉस १४ मध्ये सांगितलं होतं की जेव्हा त्यांच्या पतीचा संजयचा मृत्यू झाला होता तेव्हा त्या पूर्ण तूटल्या होत्या. यादरम्यानं त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती आली, पण ते नातं फार काळ टिकू शकलं नाही. आणि त्यानंतर त्या एकट्याच आपल्या मुलीला सांभाळत आयुष्य जगत होत्या.

Web Title: Sonali Phogat Husband Mrder Krk Urge Goa Police To Ask Sudhir Sangwan About Sanjay

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..