KBC: जया बच्चन यांच्यावर स्पर्धकाचा भलताच प्रश्न,अमिताभनाही सुचेना बोलावे काय Amitabh bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kaun Banega Crorepati 14: Contestant Sudhir Sharma questions Big B if wife Jaya Bachchan

KBC: जया बच्चन यांच्यावर स्पर्धकाचा भलताच प्रश्न,अमिताभनाही सुचेना बोलावे काय

Kaun Banega Crorepati:अमिताभ बच्चन (Amitabh bachchan)यांच्या 'कौन बनेगा करोडपती सिझन १४' ला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. एकापेक्षा एक धुरंधर स्पर्धक हॉट सीटवर बसताना दिसत आहेत. एखाद-दुसरा स्पर्धक असेल ज्यानं जिंकलेली रक्कम गमावली असेल,नाहीतर बाकी अनेकांनी लाखांमध्ये जिंकलेल्या रकमेचा आकडा आहे. काही स्पर्धक तर मोठ-मोठ्या हुद्द्यांवर चांगला मोठ्या रकमेचा पगार घेणारे देखील आहेत. काहीजणं सरकारी नोकऱ्या करणारे देखील आहेत. पण तरी देखील अनेकांनी या शो मध्ये येऊन नशीब आजमावणं पसंत केलं. शो च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये जयपूरचे सीजीएसटीचे सुप्रिटेंडंट येऊन बसले तर म्हणे दस्तुरखुद्द अमिताभ यांना घामच सुटला.(Kaun Banega Crorepati 14: Contestant Sudhir Sharma questions Big B if wife Jaya Bachchan)

हेही वाचा: Sonali Phogat: राखी सावंतचा खळबळजनक खुलासा; म्हणाली,'सोनालीच्या PA नेच...'

फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट राऊंडमध्ये सुधीर शर्मा यांनी कमीत कमी वेळात उत्तर दिलं आणि अमिताभसमोर हॉट सीटवर बसण्याचा मान पटकावला. सुधीर शर्मा हॉट सीटवर बसल्यावर अमिताभ यांनी त्यांना परिचय करुन द्यायला सांगितला. तेव्हा सुधीर म्हणाले,''ते जयपूरहून आहेत. आणि सीजीएसटी,सेंट्रल एक्साइज,कस्ट्मस चे सुप्रीटेंडेंट आहेत''. तेव्हा ते ऐकल्यावर बिग बी म्हणाले,''इथे तुम्ही गेम खेळायला आले आहात,छापे टाकू नका''. यानंतर सुधीर यांनी आपल्या पत्नीची देखील ओळख करुन दिली. तेव्हा सुधीर म्हणाले,''ती माझी पत्नी आहेच,पण आम्ही एकत्र कामही करतो. आम्ही दोघंही १९९१ च्या बॅचचे आहोत. ऑफिस आणि घर दोन्ही ठिकाणी ती मला सीनियर आहे''.

हेही वाचा: बिग बॉस फेम जॅस्मिन भसीनला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी; स्वतः केला खुलासा

हा सर्व परिचय करण्याचा भाग संपल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी खेळ सुरु केला. सगळ्यांचीच उत्तरं सुधीर यांनी द्यायला सुरुवात केली. आणि एक-एक प्रश्नाचा टप्पा पार केला. यादरम्यान सुधीर यांना बिग बी म्हणतात की त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसांत दोनच बायका माझ्यासोबत सेटवर असायच्या. एक आई आणि दुसरी माझी पत्नी जया. यावर सुधीर यांनी बिग बी ना विचारले की कधी जया बच्चन यांच्या आई सेटवर यायच्या का? यावर बिग बी ना आधी काय बोलायचं हे बहुधा सुचलं नाही पण अमिताभच ते थोडं थांबून हसत म्हणाले, ''त्या कशाला येतील, त्यांना माहित होतं जया ज्या हिरोसोबत काम करतेय त्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो''.

हेही वाचा: फेअरीटेल लव्हस्टोरी,मग लग्न आणि अचानक घटस्फोट; आमिर अली चुप्पी तोडत म्हणाला...

त्यानंतर सुधीर यांची गाडी ४० हजाराच्या प्रश्नावर अडकली. त्यांनी पहिली लाइफलाइन ऑडियंस पोलचा वापर केला. त्यानंतर दुसऱ्या लाइफलाइनचा वापर त्यांनी १ लाख ६० हजाराच्या प्रश्नावर केला आणि तिसऱ्या लाइफलाइनचा वापर ६ लाख ४० हजार च्या प्रश्नासाठी केला. आणि त्यांच्या तिन्ही लाइफलाइन संपल्या. त्यानंतर त्यांची गाडी येऊन थांबली ती १२ लाख ५० हजारच्या प्रश्नावर. त्यांना प्रश्न विचारला गेला होता की 'फीफा वर्ल्ड कप २०२२ शी संबंधित अल रिहला म्हणजे काय?' पण या प्रश्नाचं उत्तर चुकल्यानं सुधीर यांना फक्त ३ लाख २० हजार रक्कम घेऊन शो सोडावा लागला.

Web Title: Kaun Banega Crorepati 14 Contestant Sudhir Sharma Questions Big B If Wife Jaya Bachchan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..