Sonam Kapoor Delhi House : 'माझं घर म्हणजे आधुनिक भारताची...' सोनम कपूरचं दिल्लीतलं 173 कोटीचं घर पाहिलंय?

सोनम कपूरच्या (Sonam Kapoor Delhi House) दिल्लीतील त्या अलिशान घराचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Sonam Kapoor her lavish ₹173 crore Delhi home
Sonam Kapoor her lavish ₹173 crore Delhi homeesakal

Sonam Kapoor her lavish ₹173 crore Delhi home : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरची मुंबई, लंडन आणि दिल्लीमध्ये अलिशान घरं आहेत. मात्र या सगळ्यात चर्चा होत असते ती तिच्या दिल्लीतील भव्य आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या महालाची. तिनं नुकतेच इंस्टावरुन त्या घराचे फोटो शेयर करुन चाहत्यांना आगळी वेगळी मेजवानी दिली आहे.

सोनमनं तिच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी होस्टिंग करत ते खास फोटोशूट शेयर केलं आहे. सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या दिल्लीतील घराचे ते फोटो असून चाहत्यांनी त्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी सोनमच्या मुंबईतील घरातील पार्टीचे, विविध कार्यक्रमांचे फोटो व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी तिनं तिच्या दिल्लीतील घराचे फोटो शेयर करुन चाहत्यांची वाहवा मिळवली आहे.

बॉलीवूड सेलिब्रेटींची घरं, त्यांची सजावट, त्यातील वेगळेपण जाणून घेण्यास चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. अशावेळी ते घर मग करिनाचे असो किंवा कतरिनाचे त्या घराच्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद मोठा असतो. सध्या सोनम कपूरच्या घराचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिनं ते घर भारतीय सजावटीनं सजवलं आहे.

सोनमनं ते फोटो शेयर करताना म्हटलं आहे की, दुपारच्या त्या जेवणाबद्दल काय बोलावं हे आता कळेनासं झालं आहे. भारतात आलं की ज्याप्रकारे स्वागत आणि पाहुणचार होतो त्याला काही तोड नसते. माझ्या या स्वागतासाठी मी सिया, इरा, करण, रणजित, मुरुत यांना धन्यवाद देते. त्यांनी मला ही सजावट करण्यात खूप सारी मदत केली.

Sonam Kapoor her lavish ₹173 crore Delhi home
Poonam Pandey: "ती जिवंत आहे तेच माझ्यासाठी..."; पूनम पांडेच्या नवऱ्याची मोठी प्रतिक्रिया

सोनमच्या घरात झाली होती ती पार्टी...

गेल्या वर्षी प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम भारतात आला होता. तो युनिसेफचा सदिच्छादूत म्हणून आला होता. यावेळी त्याच्या स्वागतासाठी सोनमच्या घरात एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com