esakal | सात वर्षांपासून 'या' आजाराने ग्रस्त होती सोनम कपूर, व्हिडिओ पोस्ट करत स्वतःच केला खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

sonam kapoor

सोशल मिडियावर सोनम कपूरने 'स्टोरीटाईम विथ सोनम' नावाची सिरीज सुरु केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या आजाराविषयी खुलासा केला आहे.

सात वर्षांपासून 'या' आजाराने ग्रस्त होती सोनम कपूर, व्हिडिओ पोस्ट करत स्वतःच केला खुलासा

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-  अभिनेत्री सोनम कपूर सध्या एका खास कारणासाठी चर्चेत आहे. तिने तिच्या एका आजाराविषयी तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे. बॉलीवूडमध्ये एंट्री करण्याआधी सोनम कपूरचं वजन खूप जास्त होतं. मात्र तिच्या पहिल्या सिनेमाच्या आधी तिने यावर नियंत्रण मिळवलं आणि स्वतःला फिट बनवलं. आता सोनम कपूरने तिच्या ज्या आजाराविषयी खुलासा केला आहे त्याने ती सात वर्षांपासून ग्रस्त होती.

हे ही वाचा: करण जोहरने दिलं स्पष्टीकरण, 'पार्टीमध्ये ड्रग्सचं सेवन केल्याच्या बातम्या खोट्या'  

सोनम कपूर सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. तिने सध्या सोशल मिडियावर 'स्टोरीटाईम विथ सोनम' नावाची सिरीज सुरु केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या आजाराविषयी खुलासा केला आहे. या आजाराचं नाव आहे पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेत पीसीओएस. सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ आणि पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये तिने पीसीओएसच्या समस्येविषयी विस्तृतपणे सांगितलं आहे. 

सोनमने सांगितलं की, मला हा आजार कित्येक वर्षांपासून आहे. 'मी जवळपास १४-१५ वर्षांची असेन तेव्हापासून मला ही समस्या जाणवत आहे. मी कित्येक डॉक्टर्स, निसर्गोपचार तज्ज्ञ, डायटेशिअन्स इत्यादींकडे गेली होती. आता मी ठिक आहे म्हणून पीसीओएस संबंधी मी माझे काही अनुभव शेअर करु इच्छिते. सगळ्यात आधी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला फॉलो करणं गरजेचं आहे. सगळ्यांची लक्षणं वेगवेगळी असतात यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तो व्यायाम. फेरफटका मारणं. मी दररोज १० हजार पाऊलं चालते.'

सोनमने पीसीओएसवर दुसरा उपाय सांगितला आहे तो म्हणजे योगा. 'योगामध्ये मेडिटेशन आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम देखील असतात. या आजारात ताण तणावावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं.'सोनमने व्हिडिओच्या शेवटी सांगितलं की 'पीसीओएस असणा-यांना साखर खूपंच धोकादायक आहे. साखर पूर्णपणे वगळली पाहिजे.' सोनमने सांगितलं की जेव्हापासून तिने साखर सोडली आहे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. सोशल मिडियावर सोनमची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.   

sonam kapoor reveals she was patient of polycystic ovary syndrome pcos  

loading image
go to top