मोदींनी केलेल्या आवाहनाला गालबोट; अतिउत्साही मंडळींना कलाकारांनी सुनावलं

SONAM
SONAM

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे रविवार ५ एप्रिल रोजी संपूर्ण देशवासीयांनी रात्री 9 वाजता 9 मिनिटं दिवा, मेणबत्ती, मोबाईलची फ्लॅशलाईट लावली. दिव्यांच्या रोषणाईत न्हाहून निघालेल्या भारत देशाचे हे दृश्य पाहण्याचजोगेच होते. तसेच मोदींचे हे आवाहन म्हणजे एकात्मतेचं दर्शन घडवणारं होतं. पण काही अतिउत्साही लोकांनी  दिवा, मेणबत्ती, मोबाईलची फ्लॅशलाईट न लावता चक्क रस्त्यावर उतरुन फटाक्यांची आतिषबाजी केली. तर काहींनी चक्क हातात मेणबत्ती घेऊन गल्लोगल्ली रॅली काढल्या. अशा अतिउत्साही लोकांना कलाकार मंडळींनी चांगलच सुनावलं आहे.

अभिनेत्री सोनम कपूर हीने अशा अतिउत्साही लोकांना ट्विटरद्वारे चांगलच सुनावलं आहे. 'आपल्या देशातील काही लोकांनी चक्क फटाक्यांची आतिषबाजी केली. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुक्या प्राण्यांनाही त्रास झाला. शांततेच्याच वातावरणात काही अतिउत्साही आणि मुर्ख नागरिकांनी शांततेचा भंग केला', असं सोनमने म्हटलं आहे. 

तर अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या घराच्या बाल्कनीमधून काही फोटो काढत ते सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. 'काही लोकांना वाटतंय हे सेलिब्रेशन आहे' असं तिने म्हटलं आहे. 

तर मेणबत्ती घेऊन रॅली काढणाऱ्यांना 'सोशल डिस्टंसिंगचं काय झालं?' असा प्रश्न अभिनेत्री रिचा चड्डाने विचारला आहे. 

दिवा, मेणबत्ती किंवा मोबाईलची फ्लॅशलाईट सुरु ठेवण्याचे आवाहन मोदींनी केले. मात्र काही अतिउत्साही लोकांनी अगदी त्याउलट वर्तन केलं. तर काहींनी एकत्रित जमून सोशल डिस्टंसिंगचीही ऐशीतैशी केली.    

sonam kapoor taapsee pannu confused as people burst crackers during 9pm9min  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com