आई बनल्यानंतर सोनम कपूरची पहिली प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली,'मी सेल्फिश...' Sonam Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonam Kapoor Welcomes Baby Boy Gave first reaction after delivery called herself selfish

आई बनल्यानंतर सोनम कपूरची पहिली प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली,'मी सेल्फिश...'

Sonam Kapoor: सोनम कपूरची स्वारी सध्या 'सातवे आसमान पर है' असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता आई बनल्यावर आनंदाला सीमा थोडीच उरणार. सोनम आणि आनंद अहूजा यांनी त्यांच्या पहिल्या अपत्याचं वेलकम झोकात केलं आहे. सोनमच्या घरी अखेर पाळणा हलला. अभिनेत्रीच्या पोटी मुलगा जन्माला आला आहे. पहिलं बाळ आणि आई होण्याचा आनंद काही औरच असतो. प्रेग्नेंसी दरम्यान सोनमने प्रत्येक टप्प्यावर तिला काय फिल होतंय हे अनेकदा शेअर केलं होतं. पण आता समोर येतेय तिची आई झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया.(Sonam Kapoor Welcomes Baby Boy Gave first reaction after delivery called herself selfish)

हेही वाचा: बॉलीवूडचं डार्क सीक्रेट काय? पोलखोल करत अग्निहोत्री म्हणाले,'इथे जे...'

२० ऑगस्ट,२०२२ रोजी सोनमने अखेर अधिकृतरित्या जाहिर केलं की ती आई बनली असून तिच्या पोटी मुलगा जन्माला आलेला आहे. फॅशन मॅगझीनशी बोलताना सोनमने आपल्या एका निर्णयाचा मोठा खुलासा केला आहे. सोनमने म्हटलं आहे की,''आता आमच्या प्रायोरिटीज बदलतील. आमचं मुल आता आमची जबाबदारी असणार''. सोनम म्हणाली,''आता आमच्या प्रायोरिटीज बदलतील. मुल आता अर्थातच आमची जबाबदारी असणार. कारण मुलं काही आपल्या मनाने या जगात येत नाही,त्यांना आपण आपल्या इच्छेसाठी या जगात आणतो. हा खूप स्वार्थी वृत्तीनं घेतलेला निर्णय आहे. आपण सगळेच स्वार्थी आहोत''.

हेही वाचा: 'क्राइम पेट्रोल'च्या निर्मात्याला 'गॅंग्ज ऑफ वासेपूर'च्या लेखकानं लूटलं...

सोनम कपूरनं मुलाला जन्म दिल्यावर सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून हे जाहीर केलं. सोनमने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की,''२०-०८-२०२२, आम्ही आमच्या लाडक्या मुलासमोर झुकून त्याचं मनापासून स्वागत केलं आहे. मी समस्त डॉक्टर्स,नर्स,माझा मित्रपरिवार आणि कुटुंबाचे मनापासून धन्यवाद मानते. ही फक्त सुरुवात आहे, पण मला माहित आहे आमचं आयुष्य आता पूर्ण बदलणार आहे-सोनम-आनंद''

हेही वाचा: 'शाहरुखकडून शिका...'; बॉलीवूडला विकी कौशलच्या वडीलांनी दिलेला सल्ला चर्चेत

सोनम कपूरची ही आनंदाची बातमी जशी व्हायरल झाली तसं तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली. सोनम आई झाल्याची माहिती नीतू कपूर यांनी इन्स्टा स्टोरीतून दिली. अर्थात ही पोस्ट सोनम आणि आनंद यांनीच लिहिली होती. नीतू कपूर यांनी पोस्ट शेअर करत सोनम,आनंद,अनिल कपूर,सुनीता कपूर यांना शुभेच्छा दिल्या. अनिल कपूर देखील नातवाच्या येण्याने भलतेच खूश आहेत. अनिल कपूर यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की,''बाळ सुदृढ आहे, सोनम आणि आनंदनं बाळाचं वेलकम केलं आहे. आमच्या सर्वांच्या मनात बाळासाठी फक्त प्रेम आणि खूप सारं प्रेम आहे. नवीन आई-बाबांना खुप शुभेच्छा''.

Web Title: Sonam Kapoor Welcomes Baby Boy Gave First Reaction After Delivery Called Herself

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..