बॉलीवूडचं डार्क सीक्रेट काय? पोलखोल करत अग्निहोत्री म्हणाले,'इथे जे...' Vivek Agnihotri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri speaks out about dark secrets of bollywood in his latest post

बॉलीवूडचं डार्क सीक्रेट काय? पोलखोल करत अग्निहोत्री म्हणाले,'इथे जे...'

Vivek Agnihotri: बॉलीवूडचे(Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आपल्या 'द काश्मिर फाईल्स' सिनेमामुळे भरपूर लोकप्रिय झाले. आपल्या सिनेमाच्या माध्यमातून अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय लोकांसमोर मांडणारे विवेक अग्निहोत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास सगळ्याच मुद्द्यावंर मतप्रदर्शन करताना दिसतात. ते आपल्या बिनधास्त, रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून तर ते बॉलीवूडवर निशाणा साधताना दिसत आहेत. याच संदर्भात विवेक यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.(Vivek Agnihotri speaks out about dark secrets of bollywood in his latest post)

Vivek Agnihotri speaks out about dark secrets of bollywood in his latest post

Vivek Agnihotri speaks out about dark secrets of bollywood in his latest post

विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर करत थेट बॉलीवूडवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. आणि त्यासोबत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. सोबत एक कॅप्शन दिलं आहे की,'बॉलीवूड, अंतर्गत कहाणी,गुपितं,कृपया वाचा'. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोत लिहिलं आहे की,''आता बॉलीवूडमध्ये इतके दिवस मी घालवलेयत की मला इथे काम कसं चालतं हे उत्तम कळतं''.

हेही वाचा: राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीविषयी अखेर रुग्णालयाकडून मोठी अपडेट, चिंता वाढली..

ते पुढे म्हणालेयत की,''बॉलीवूड जसं दिसतं तसं मुळीच नाही. खरं बॉलीवूड तर अंधारातील गल्ल्यांमध्ये वसतं,ज्याला पाहणं,अनुभवणं सर्वसामान्याच्या समजण्यापलिकडे आहे. चला मी तुम्हाला समजावतो. बॉलीवूड जर कथांचा संग्रहालय आहे तर इथे प्रतिभेचं कबरिस्तान देखील वास करतं. हे कुठल्याही रिजेक्शन संदर्भात नाही तर त्या अपमान-शोषण संदर्भात आहे ज्यांनी अनेकांची स्वप्न नेस्तनाबूत केली आहेत. एक व्यक्ती खाण्याशिवाय जगू शकतो पण त्याचा सम्मान आणि आशा-आकांक्षा यांच्याशिवाय त्याचं जगणं मुश्किल होऊन बसतं''.

आपल्या या पोस्टमध्ये विवेक यांनी बॉलीवूडमधील अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ते पुढे म्हणाले आहेत की,''हे खूप दुःखदायक आहे की लढाई लढण्याऐवजी इथे लोक हार मानताना दिसत आहेत. भाग्यशाली तीच लोकं जे सुरक्षित त्यांच्या घरी परत जाऊ शकतात. जर ते इथे राहिले तर पूर्णपणे तुटून जातात. पण काही असे लोकही आहेत ज्यांना दिखावा करणारं यश मिळून जातं,मग ते ड्रग्ज,मद्य यासारख्या व्यसनांच्या आहारी जातात आणि आपलं आयुष्य खराब करून घेतात''. तसंच, विवेक यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून बॉलीवूडच्या इतर कितीतरी डार्क सीक्रेट्सना समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Vivek Agnihotri Speaks Out About Dark Secrets Of Bollywood In His Latest

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..