esakal | बर्फात खोदलं भुयार, रँचोची कमाल;  व्हिडिओ व्हायरल 

बोलून बातमी शोधा

sonam wangchuk video viral on social media make ice tunnel in jammu kashmir}

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यानं थंड प्रदेशामध्ये कमी खर्चात वॉटर हिटर कसे तयार करता येईल याचा विचार केला होता.

बर्फात खोदलं भुयार, रँचोची कमाल;  व्हिडिओ व्हायरल 
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - थ्री इडियट्स मध्ये रँचो मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला होता. त्याचे खरे नाव सोनम वांगचूकनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो त्याच्या क्रिएटीव्हीसाठी प्रसिध्द आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही त्यानं सैनिकाना उपयोगी पडणारे उपकरण तयार केले होते. त्यामुळे तो चर्चेत आला होता. आताही त्यानं असे काही केले आहे की त्याचा गवगवा देशभर झाला आहे. नवनवीन प्रयोगासाठी प्रसिध्द असणा-या वांगचूकनं आपल्या ज्ञानाचा उपयोग हा समाजासाठी करण्याचा निर्धार केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यानं थंड प्रदेशामध्ये कमी खर्चात वॉटर हिटर कसे तयार करता येईल याचा विचार केला होता. आणि ते उपकरण त्यानं प्रत्यक्षात आणलं होतं. आताही त्यानं त्याच्या बुध्दीची कमाल दाखवली आहे. त्यामुळे तो सर्वांच्या कौतूकाचा विषय ठरला आहे. आमिर खानची थ्री एडियटस हा चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला होता. त्यानं तयार केलेल्या वस्तुंना देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. थंड प्रदेशामध्ये मायनसमध्ये तापमान असतानाही गर्मी देणारा हिटर त्यानं बनवला होता. त्यामुळे सोशल मीडियात त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली.

वांगचूकनं आता जो एक नवीन शोध लावला आहे त्याचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानं त्या व्हिडिओसाठी प्रचंड संशोधन केले आहे. वांगचूकन काय केलं आहे माहिती आहे, बर्फात सुरंग तयार करण्याची आयड़िया त्यानं शोधून काढली आहे. सध्या श्रीनगर आणि लेहच्या हायवे मध्ये काम सुरु आहे. त्याचा व्हिडिओ त्यानं आपल्या सोशल अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

सोनमनं शुक्रवारी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यानं जम्मु आणि काश्मिर मधील जोजिलाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यात सोनमनं सांगितले आहे की, जोजिलामध्ये सुरुंग बनविल्यास त्याचा सर्वसामान्य लोकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यानं यापुढे असे सांगितले आहे की, हा बोगदा पर्यावरणासाठीही पोषक असणार आहे. तसेच त्यासाठी फारसा खर्च येणार असल्यानं आर्थिक नुकसानही कमीच आहे. यामुळे होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे 500 टन कार्बन डाय ऑक्साईड आणि कित्येक कोटी रुपयांची बचत होणार आहे.