''खुदा हाफिज"मधील 'जान बन गये' हे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला...

संतोष भिंगार्डे
गुरुवार, 30 जुलै 2020

"खुदा हाफिज" या चित्रपटात विद्युत जामवाल, शिलीका ओबेरॉय, अन्नू कपूर, आहाना कुमरा आणि शिव पंडित हे कलाकार आहेत.

मुंबई : अनेक आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर डिस्नी + हॉटस्टारने गेल्या आठवड्यात बहुप्रतिक्षित बॉलिवूड फिल्म "खुदा हाफिज"चा ट्रेलर रिलीज केला. ट्रेलरची प्रेक्षकांकडून प्रशंसा झाल्यानंतर निर्मात्यांनी काल चित्रपटाचे 'जान बन गये' पहिले गाणे रिलीज केले आहे. या गाण्याने चित्रपटाचा मूड उत्तम प्रकारे सेट केला आहे. या गाण्यात विद्युत जामवालचा रोमँटिक अंदाज आपल्याला दिसेल.

आयटीआयची प्रवेश प्रवेशप्रक्रिया 1 ऑगस्टपासून; यंदा तब्बल 'इतक्या' जागा उपलब्ध.... 

या गाण्याचे संगीतसंयोजन मिथुन शर्मा यांनी केले असून मिथुन, विशाल मिश्रा आणि असीस कौर यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्यांमध्ये भावभावनांचे चित्रण करण्यात आले आहे. रोमँटिक अवतारात दिसणारा अभिनेता विद्युत जामवाल म्हणतो, “मी नेहमीच मिथून आणि त्याच्या कामाचे कौतुक केले आहे. हे गाणे ही एक उत्कृष्ट रचना आहे आणि ती प्रेक्षकांसमोर आणायला मी उत्सुक आहे.”

लॉकडाऊनमधून नव्हे, तर 'यामध्ये' सूट द्या; पुरुषांनी केली न्यायालयाकडे मागणी...

"खुदा हाफिज" या चित्रपटात विद्युत जामवाल, शिलीका ओबेरॉय, अन्नू कपूर, आहाना कुमरा आणि शिव पंडित हे कलाकार आहेत.  या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन फारूक कबीर यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओ इंटरनॅशनल) यांनी केली आहे. हा सिनेमा 14 ऑगस्ट 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: song jaan ban gaye from the movie khuda hafij released