esakal | लॉकडाऊनमधून नव्हे, तर 'यामध्ये' सूट द्या; पुरुषांनी केली न्यायालयाकडे मागणी...
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊनमधून नव्हे, तर 'यामध्ये' सूट द्या; पुरुषांनी केली न्यायालयाकडे मागणी...

कोरोना महामारीतून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन अंमलात आले, पण त्याचे प्रतिकूल परिणाम अनेकांना सहन करावे लागत आहे. उद्योग, व्यवसाय ठप्प झालेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आल्या, पगार कपात होत आहे.

लॉकडाऊनमधून नव्हे, तर 'यामध्ये' सूट द्या; पुरुषांनी केली न्यायालयाकडे मागणी...

sakal_logo
By
संजय घारपुरे

मुंबई : कोरोना महामारीतून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन अंमलात आले, पण त्याचे प्रतिकूल परिणाम अनेकांना सहन करावे लागत आहे. उद्योग, व्यवसाय ठप्प झालेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आल्या, पगार कपात होत आहे. परिणामी अनेकांना आर्थिक तसेच मानसिक परिणामांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या या परिस्थितीचा सामना आता घटस्फोटीत पतींनाही करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वेतन कपात किंवा उत्पन्न घटल्याने विभक्त पत्नी आणि मुलांना देण्यात येणाऱ्या पोटगीच्या रकमेत सूट देण्याची विनंती अनेकजण न्यायालयाकडे करत आहेत. 

हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आली 'ही' आनंदाची बातमी

कौटुंबिक न्यायालयात काम पाहणाऱ्या, विशेषतः घटस्फोटाचे काम करणाऱ्या वकिलांना अनेक जण पोटगी कमी करण्यासाठी याचिका करण्याची विनंती करीत आहेत. एका अभिनेत्यास विभक्त पत्नी आणि मुलांच्या खर्चासाठी महिना 70 हजार रुपये देण्यास सांगितले आहे. पण आता आपले कामच बंद आहे, त्यामुळे ठरलेल्या रकमेच्या निम्मी रक्कम देणेही अवघड असल्याचे सांगितले आहे. कलाकाराची पत्नी पत्रकार आहे. तिला काहीतरी उत्पन्न मिळत आहे, पण शूटिंग बंद असल्याने कलाकारांना उत्पन्न कसे मिळणार अशी विचारणा वकिल वंदना शाह यांनी केली असल्याचे वृत्त आहे. 

अखेर डबल डेकर बस धावली रस्त्यावर, 'या' मार्गावर असेल सेवा

अनेकदा विभक्त पती पत्नीला नियमीत पोटगी देण्यास तयार नसतात. त्यासाठी अनेक कारणे सांगितली जातात , पण त्यावेळी न्यायालय कठोर भूमिका घेत असते. मात्र आता न्यायालयही परिस्थितीचा विचार करीत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अर्थात यापूर्वी निकाल देण्यात आलेले आता अनेक जण अंतरिम याचिका सादर करुन पोटगी कमी करण्यासाठी विनंती करीत आहेत. बँकेत काम करणाऱ्या व्यक्तीने आता पूर्वीइतकी पोटगी देणे अशक्य आहे. आमच्या पगारात कपात झाली आहे, असे सांगतानाच आपल्या पगाराचे प्रमाणपत्र सादर केले. नोकरदार एकवेळ हे प्रमाणपत्र सादर करु शकतील, पण स्वतःचा उद्योग असलेले कोणते प्रमाणपत्र दाखवणार, अशी विचारणा वकिल मृदुला कदम यांनी केली. 

मुंबईकर महिलांची प्रतिकार शक्ती पुरुषांपेक्षा जास्त, सिरो सर्व्हेचा निष्कर्ष...

लॉकडाऊन पूर्ण संपल्यावर पोटगी कमी करण्यासाठी न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकांची संख्या वाढेल, याकडे अॅड. अमित कारखानीस यांनी लक्ष वेधले. मात्र त्यांनी यामुळे महिलांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या वकिल वीणा गौडा यांनी या याचिकांमुळे महिलांनाच जास्त त्रास होणार आहे. सरकारने या महिलांना आता साह्य करायला हवे, असे त्यांनी सांगितले.
----
संपादन ः ऋषिराज तायडे

loading image