
"लोक मूर्ख नाहीत"; रिअॅलिटी शोमधील ड्रामावर सोनू निगमची टीका
प्रसिद्ध गायक सोनू निगम (sonu nigam) त्याच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. तो अनेक रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसला आहे. 'सा रे ग म प' आणि 'इंडियन आयडॉल' या शोचे त्याने परीक्षण केले आहे. मात्र या शोमध्ये दाखवला जाणारा मेलोड्रामा अती असल्याची टीका सोनूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केली आहे. "रिअॅलिटी शोजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या मेलोड्रामाला लोकांची सहानुभूती मिळते, आणि म्हणूनच ते वारंवार दाखवलं जातं," असं तो म्हणाला. पण दुसरीकडे स्पर्धकसुद्धा अत्यंत प्रतिभावान आणि हुशार असल्याचं सोनूने नमूद केलं. इंडियन आयडॉलच्या पहिल्या सिझनचा विजेता अभिजीत सावंतने (abhijeet sawant) काही दिवसांपूर्वी या शोच्या सध्याच्या सिझनवर टीका केली होती. त्याचेही असे मत होते की, स्पर्धकांच्या गाण्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. (sonu nigam give comment on sob stories in reality shows)
"जर रिअॅलिटी शोमधील मेलो ड्रामाला लोकांची पसंती मिळत नसती तर ते इतक्या प्रमाणावर दाखवले नसते. हा ड्रामा थोड्याफार प्रमाणात शोसाठी चांगला असतो. कारण हा शोच्या मार्केटिंगचा भाग आहे. पण लोक मूर्ख नाहीत. शोमधील स्पर्धक हे खूप हुशार आणि प्रतिभावान आहेत. ते 'धुरंधर' आहेत," असं सोनू निगम म्हणाला.
सोनूने पुढे सांगितले, "मनोरंजनाची व्याख्या ही प्रत्येक माणसाची वेगळी असते. नुकताच मी एक कोरियन चित्रपट पाहिला आणि ते पाहून मी प्रभावित झालो. या चित्रपटामुळे मला माझ्या कठीण काळाची आठवण झाली. पण तो चित्रपट काहींना कंटाळवाणा वाटू शकतो. गायनाच्या शोवर प्रतिक्रिया देणारा मी कोण आहे? त्यांचं काम चांगलं सुरू आहे, त्यांना टीआरपी देखील मिळत आहे."
हेही वाचा: 'तू डुकरासारखी दिसतेस'; प्रियामणीने सांगितला बॉडी शेमिंगचा धक्कादायक अनुभव
'इंडियन आयडॉल'च्या वादात घेतली होती उडी
किशोर कुमार यांना समर्पित केलेल्या एपिसोडवरुन वाद निर्माण झाला होता. त्यावर सोनू म्हणाला होता, "अमित कुमार ही खूप मोठी व्यक्ती आहे. सर्वांत पहिली गोष्टी म्हणजे ते आमच्या उस्ताद म्हणजेच किशोर कुमार यांचे पुत्र आहेत. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त ही इंडस्ट्री पाहिली आहे. आमच्यापेक्षा अधिक जग त्यांनी पाहिलंय. अत्यंत साध्या स्वभावाची व्यक्ती आहे ती. कधीच कोणाला काही बोलत नाहीत. त्यांच्या शांततेचा तुम्ही फायदा घेत आहात." सोनूने माध्यमांना आणि इंडियन आयडॉलला हा वाद संपवण्याची विनंती केली होती.
हेही वाचा: सोनाली कुलकर्णीची आफ्रिका 'सफारी'
Web Title: Sonu Nigam Give Comment On Sob Stories In Reality
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..