'गाढवांनो, मूर्खांनो..'; ट्रोलर्सना सुनावताना ढासळला सोनू निगमचा तोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonu nigam

'गाढवांनो, मूर्खांनो..'; ट्रोलर्सना सुनावताना ढासळला सोनू निगमचा तोल

गायक सोनू निगमने Sonu Nigam सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना रक्तदानाचं Blood Donation आवाहन केलं. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करणं गरजेचं असल्याचं त्याने सांगितलं. यासोबतच त्याने स्वत: रक्तदान करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र याच फोटोंवरून त्याला ट्रोल करण्यात आलं. मास्क न घातल्याने नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यावर सोनूचा पारा चढला आणि त्याने टीकाकारांना सुनावलं. (Sonu Nigam lashes out at trolls who slammed him for not wearing a mask while donating blood)

सोनू निगमचं उत्तर-

'इथे जे आईनस्टाइन आहेत, त्यांना मी त्यांच्यात भाषेत उत्तर देऊ इच्छितो. गाढवांनो, मूर्खांनो, रक्तदान करताना मास्क घालण्याची परवानगी नसते. तुम्ही आणखी किती खालच्या पातळीला जाणार आहात', अशा शब्दांत सोनू निगमने त्यांना सुनावलं.

हेही वाचा : 'सात पिढ्यांना पुरेल एवढा पैसा नेत्यांनी कमवलायं, जनता माफ करणार नाही'

सोनू निगम गेल्या अनेक कालावधीपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र वादग्रस्त विधानांमुळे तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. सोनूने 'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोवरही अनेक आरोप केले होते. या शोमधील गायक हे स्टेजवर केवळ लिपसिंक करत असल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला होता. सोनूने 'टी सीरिज'च्या भूषण कुमार यांच्याशीही पंगा केला होता.

Web Title: Sonu Nigam Lashes Out At Trolls Who Slammed Him For Not Wearing A Mask While Donating

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sonu nigam
go to top