
'सात पिढ्यांना पुरेल एवढा पैसा नेत्यांनी कमवलायं, जनता माफ करणार नाही'
मुंबई- बिग बॉस सिझन 14 मधील प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत (rakhi sawant) तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. कोरोना काळात देशात सुरू असलेल्या घडामोडींवर राखी भाष्य करत असते. नुकतेच राखीने देशातील मंत्र्यावर (ministers of india)वक्तव्य केले आहे. तसेच केंद्र सरकार आणि राज्यसरकारवर राखीने टिका केली आहे. राखी म्हणाली,' मी देशातील सर्व मंत्र्यांना सांगत आहे की, देशातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. ज्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्यावर आपण अंत्यविधी देखील करू शकलो नाही. ते लोक आपल्याला माफ करतील? देव आपल्याला माफी देईल ? तुम्हाला काय वाटत तुम्ही सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा तुम्ही साठवलाय? आपल्या देशातील गरिब जनतेला ऑक्सिजन आणि व्हॅक्सिन मिळत नाहीये. ज्या कुटुंबामधील व्यक्तीने कोरोनामुळे जीव गमावला आहे. ते तुम्हाला कधीच माफ करणार नाही.' (rakhi sawant got angry on ministers of india)
त्यानंतर बॉलिवूड कलाकरांचे कौतुक करत राखी म्हणाली ,'माझे मत आहे की सोनू सूद किंवा सलमान खानने पंतप्रधान झालं पाहिजे, कारण ते खरे हीरो आहेत. सोनू सूद, सलमान खान, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन आपल्या देशातील नागरिकांना मदत करत आहेत.' राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील राखीच्या मताला अनेक नेटकऱ्यांनी सहमती दिली आहे.
हेही वाचा: 'कौतूक तर होणार', गायिका अनुराधा पौडवाल मदतीला
हेही वाचा: Video : 'येऊ कशी..'च्या सेटवर शुभांगी गोखलेंना अश्रू अनावर
राखीच्या व्हिडीओला सोशल मीडियावर पसंती मिळते. काही दिवसांपुर्वी राखीचा मदर्सडेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये राखीने तिच्या आईला साडी भेट म्हणून दिली. व्हिडीओत राखी म्हणाली की, 'तुमच्या आईला ऑनलाइन नाही तर ऑफलाइन शुभेच्छा आणि भेट द्या.' राखी बिगबॉसमध्ये असताना तिच्या आईची तब्बेत बिघडली होती.
Web Title: Rakhi Sawant Got Angry On Ministers Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..