esakal | कॅन्सरग्रस्त तमिळ अभिनेत्याची अशी झालीये अवस्था.. उपचारांसाठी पैसै नसल्याने केलं मदतीचं आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

thavasi

थवासी कॅन्सरग्रस्त आहेत. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोशल मिडियावर  सध्या थवासी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या चाहत्यांकडून उपचारासाठी मदत मागताना दिसतायेत.

कॅन्सरग्रस्त तमिळ अभिनेत्याची अशी झालीये अवस्था.. उपचारांसाठी पैसै नसल्याने केलं मदतीचं आवाहन

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- तमिळ सिनेमाचे प्रसिद्ध अभिनेते थवासी सध्या आयुष्याच्या खडतर वळणावर आहेत. ते कॅन्सरग्रस्त आहेत आणि त्यांची अवस्था खूप खराब झाली आहे. अशातंच आता त्यांनी जवळच्या मित्रांकडे आणि चाहत्यांकडे मदतीची विनंती केली आहे. थवासी यांनी साऊथच्या अनेक सिनेमांमध्ये जबरदस्त अभिनय करत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मात्र सध्या ते हलाखीच्या परिस्थितीत आहे. सोशल मिडियावर त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

हे ही वाचा: नीतू कपूर यांनी ७ वर्षांनंतर सेटवर केलं कमबॅक, 'या' सिनेमाच्या शूटींगला केली सुरुवात  

मिडिया रिपोर्ट्सनुसार, थवासी कॅन्सरग्रस्त आहेत. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोशल मिडियावर  सध्या थवासी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या चाहत्यांकडून उपचारासाठी मदत मागताना दिसतायेत. व्हिडिओमध्ये थवासी यांना ओळखणं देखील शक्य होत नाहीये. ते कॅन्सरमुळे खूप बारिक झालेले दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये थवासी चाहत्यांकडे मदतीची याचना करत आहेत. 

मदतीचं आवाहन करत ते म्हणत आहेत, ''माझं सिनेजगतात ३० वर्षांपेक्षा जास्त करिअर आहे. मी 'कीजहक्कु चीमाईले' पासून ते आगामी 'अन्नथा' पर्यंत अभिनय केला आहे. मी कधी विचार देखील केला नव्हता की मला असा आजार होईल. मी काहीच करण्याच्या स्थितीत नाहीये. मी व्यवस्थित बोलू देखील शकत नाहीये. मी या इंडस्ट्रीमध्ये काम करणा-या सहकलाकार आणि लोकांना माझी मदत करण्याची विनंती करतो. जेणेकरुन मी यातून लवकर बरा होऊन पुन्हा अभिनय करु शकेन.''  

सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चाहते ते लवकरंच बरे होऊ देत यासाठी प्रार्थना करत आहेत. मिडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सिवाकार्तिकेयन थवासी यांचं हॉस्पिटलचं बील भरण्यासाठी पुढे आले आहेत.   

tamil actor thavasi is currently in an extremely bad condition due to cancer  

loading image