
मुंबई- बॉलीवूड अभिनेता सोनू सूदचं नाव गेल्या कित्येक महिन्यांंपासून अनेकांच्या तोंडावर आहे. लॉकडाऊन दरम्यान सोनूने कित्येकांना मदत करुन आपलंसं केलं होतं. त्याच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे लोकांना त्याला रिल हिरोपासून रिअल हिरोचा दर्जा दिला. नुकतीच त्याची २०२० च्या नंबर एक एशियाई व्यक्तीच्या रुपात निवड झाली. कित्येक बॉलीवूड सेलिब्रिटींना मागे टाकत त्याने हा सन्मान मिळवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युके स्थित ईस्टन आय वृत्तपत्रामध्ये प्रकाशित ५० एशियाई सेलिब्रिटींमध्ये सोनू सूदने पहिलं स्थान मिळवलं आहे. या सूचीच्या माध्यमातून त्या कलाकारांना सन्मानित केलं गेलं आहे ज्यांनी आपल्या कामाने समाजात सकारात्मक छबी निर्माण केली आहे आणि लोकांना प्रेरणा दिली आहे.
हा सन्मान मिळाल्यावर सोनू सूदने आभार व्यक्त करत म्हटलं आहे की, ''माझ्या प्रयत्नांची जाणीव ठेवल्याबद्दल ईस्टन आय धन्यवाद. जशी ही रोगराई आली मला असं वाटलं की माझ्या देशवासियांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. ही एक अशी गोष्ट होती ज माझ्या आतल्या मनातून आली. मी जे केलं ते एक भारतीय म्हणून माझी जबाबदारी होती आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन.''
ईस्टरर्न आयचे संपादक असजद नसीर यांनी लीस्ट तयार केली. त्यांनी सांगितलं की सोनू सूदचा यावर हक्क आहे कारण लॉकडाऊनमध्ये दुस-यांची मदत करण्यासाठी कोणा इतर व्यक्तीने असं काम केलेलं नाही. या लिस्टमध्ये सिनेमा, संगीत आणि फॅशनच्या कॅटगरी व्यतिरिक्त इतर भारतीयांचा देखील समावेश आहे.
sonu sood becomes top global asian celebrity 2020 see list
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.