esakal | बिहारमध्ये एनडीएची सत्ता आल्यानंतर सोनू सूदने दिली प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

sonu sood

''कोण जिंकलं हे महत्वाचं नसून पाच वर्षांनी बिहार बदलला असेल हे महत्वाचं आहे.''

बिहारमध्ये एनडीएची सत्ता आल्यानंतर सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित कामगारांसाठी देवदूत बनला. इतकंच नाही तर लॉकडाऊननंतरही अडचणीत असलेल्या अनेकांना सोनूने मदतीचा हात दिला. नुकतीच सोनूने बिहारमध्ये पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

हे ही वाचा: 'आश्रम 2' मधील अभिनेत्रीचा खुलासा, ''अध्यात्मिक गुरुंनी माझ्यासोबत..''    

सोनू सूदने बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर बिहारमधील लोकांना सरकारने केलेलं काम योग्य वाटत असल्याने त्यांनी पुन्हा संधी दिली असावी असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. भारतातील लोकांना जास्त अपेक्षा असतात त्यामुळे ते अनेकदा दुसरी संधी देतात असंही त्याने म्हटलंय.

सोनू सूदने पुढे म्हटलंय की, “लोकांना काहीतरी योग्य दिसलं असावं. भारतातील लोकांना फार अपेक्षा असतात आणि ते कधीतरी तुम्हाला दुसरी संधी देतात किंवा तिसरी संधीही देतात. आपलं आयुष्य अजून चांगलं व्हावं असं त्यांना वाटत असतं” असं सोनू सूदने म्हटलंय. 

''बिहारमधील अनेक लोकांशी मी जोडला गेलो आहे. शिक्षण किंवा पायाभूत सुविधांबद्दल जेव्हा कधी चर्चा केली जाते तेव्हा स्थिती वाईट असल्याचं लक्षात येतं. कोण जिंकलं हे महत्वाचं नसून पाच वर्षांनी बिहार बदलला असेल हे महत्वाचं आहे. विश्वास ठेवून सत्तेत आणलेल्या सरकारचा त्यांना अभिमान वाटला पाहिजे हे महत्वाचं आहे” असं मत सोनू सूदने व्यक्त केलंय.  

बिहारमध्ये जवळपास १८ तासांच्या मतमोजणीनंतर १२३ जागांसह एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं सिद्ध झालं. भाजपाला ७४ जागा मिळाल्या असताना नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला मात्र फक्त ४३ जागांवर विजय मिळवता आला. सोनू सूदने लॉकडाऊनमध्ये, पूरपरिस्थितीमध्ये अनेकांना त्यांचं डोक्यावरचं छप्पर, शिक्षणाच्या सुविधा, शेतक-यांना त्यांच्या गरजा पुरवण्याचं काम केलं आहे.

sonu sood on bihar result sometimes people give you a second chance  
 

loading image