Sonu Sood: 'सोनू असो किंवा टोनू', चुकीचं बोलला नेटकऱ्यांनी झापडला

बॉलीवूडमध्ये ज्याला मसीहा म्हटलं जातं त्या प्रसिद्ध अभिनेता सोनु सूदला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
Mumbai
MumbaiSakal

Sonu Sood News: बॉलीवूडमध्ये ज्याला मसीहा म्हटलं जातं त्या प्रसिद्ध अभिनेता सोनु सूदला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. सोनु हा कधी नेटकऱ्यांना दुखावत नाही मात्र आता त्याच्या एका वक्तव्यामुळे तो चर्चेत आले आहे. यामुळेच की काय नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या काळात बॉलीवूडमध्ये जर कोणत्या सेलिब्रेटीनं कोरोनाग्रस्तांना मदत केली असेल तर ती सोनु सूदनं. तो त्याच्या सोशल वर्कसाठी ओळखला जाणारा अभिनेता सेलिब्रेटी आहे.

सोनुचा फॅन क्लब मोठा आहे. इंस्टावर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनुच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र त्यानं आपल्याला त्यात रस नसून लोकोपयोगी काम करुन त्यांचे प्रश्न सोडवणे हे जास्त महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. राजकारणात न जाता देखील लोकांना मदत करता येते हे सोनुनं दाखवून दिले आहे. मात्र काहीवेळेला त्याला नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे.

त्याचं झालं असं की, सोनु हा मुंबईच्या लोकल ट्रेननं प्रवास करत होता. त्याचे काही फोटो त्यानं सोशल मीडियावरुन शेयर केले आहेत. त्यामध्ये तो लोकल ट्रेनमध्ये बसलेला दिसतो आहे. एका स्टेशनवरील पाणपोईवर पाणी पिताना दिसतो आहे. यावेळी त्यानं हे पाणी मिनरल वॉटरपेक्षाही जास्त शुद्ध असल्याचे सांगितले. त्यामुळे सोनुला ट्रोल व्हावे लागले आहे. अशाप्रकारे ट्रोल होण्याचा सोनुचा काही पहिलाच प्रसंग नाही. त्याला बऱ्याचदा त्याच्या वक्तव्यामुळे वादाचा सामना करावा लागला आहे.

Mumbai
Adipurush Controversy: 'चूकीला माफी नाही', युपीचे उपमुख्यमंत्री भडकले!

रेल्वे स्टेशनचे लाईफ हे फार वेगळे असते. त्याविषयी जेवढे बोलावे तेवढे कमी आहे. आपल्याला त्या स्टेशनवरील लाईफ अनुभवता येत नाही. आपण त्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतो. त्याचा आपल्याला तोटा होतो. आता रात्रीचे दहा वाजणार आहेत. आम्ही सगळेजण बोईसरला आहोत. शुटिंगवरुन पॅकअप केले आहे. याठिकाणी जसे वातावरण आहे तसे आणखी कुठेच नाही. हे मला आवर्जुन सांगायचे आहे. अशी प्रतिक्रिया सोनुनं दिली आहे.

Mumbai
Viral News: मानलं पठ्ठ्याला! २४ तासात परत मिळवला घालवलेला जॉब, नेमकं काय केलं त्याने?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com