
सोनुला कोणी देवदुत म्हणालं तर कोणी थेट देवळात त्याची मुर्ती स्थापन करुन त्याला देवाचा दर्जा दिला. सोनूने या कठीण काळात केलेली मदत कोणीच विसरु शकणार नाही. त्याच्या या कौतुकास्पद कामामुळे लोक त्याला एका नावाने ओळखु लागले ते म्हणजे 'मसीहा.'
मुंबई- कोरोना व्हायरसच्या महारोगराईमुळे देशभरात जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने सिनेमातील भूमिकेपेक्षा रिअर लाईफमध्ये त्याची वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. सोनूने लॉकडाऊनमध्ये गरजुंना, स्थलातरित लोकांना जी मदत केली त्यामुळे अनेकांनी त्याला वेगवेगळी उपमा दिली. कोणी देवदुत म्हणालं तर कोणी थेट देवळात त्याची मुर्ती स्थापन करुन त्याला देवाचा दर्जा दिला. सोनूने या कठीण काळात केलेली मदत कोणीच विसरु शकणार नाही. त्याच्या या कौतुकास्पद कामामुळे लोक त्याला एका नावाने ओळखु लागले ते म्हणजे 'मसीहा.'
हे ही वाचा: रिभुदास गुप्ता यांच्या आगामी सिनेमात 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार परिणीती चोप्रा
नुकत्याच तेलंगणामधील एका गावात सोनूची मुर्ती स्थापन करुन लोक त्याची पूजा करु लागले. लोकांच हे प्रेम पाहून सोनू भारावून गेला. मात्र असं असलं तरी दरवेळी तो एकच गोष्ट सांगत राहिला की त्याने केवळ त्याचं एक कर्तव्य बजावलं. त्याने नेहमी हेच सांगण्याचा प्रयत्न केला की तो देव नाहीये आणि आता यावरंच त्याचं एक पुस्तक देखील समोर आलं आहे ज्याचं नाव आहे 'आय ऍम नो मसीहा.' सोनूने या पुस्तकाविषयीची माहिती सांगत ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
सोनू सूदचा हा व्हिडिओ लगेचच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सोनू मुंबई एअरपोर्टवर असलेल्या पुस्तकाच्या स्टॉलमध्ये दिसून येतोय. तसंच खास गोष्ट अशी की जर हे पुस्तक तुम्ही मुंबई एअरपोर्टवरुन घेतलं तर तिथे तुम्हाला सोनूचा ऑटोग्राफ असलेलं पुस्तक मिळेल. याबाबतची माहिती स्वतः सोनू सूदने ट्विट करत दिली आहे.
My book - #IamNoMessiah - is out now! Signed copies of my book are available at mumbai airport with BookScetra. You can also order my book online from: https://t.co/DeXuAgjSOJ English and Hindi https://t.co/bdhBsJDdpH pic.twitter.com/BoMsqrLVuC
— sonu sood (@SonuSood) December 26, 2020
सोनू सूदचं हे पुस्तक वाचण्यासाठी त्याचे अनेक चाहते आतुर आहेत. या पुस्तकात आता कोण कोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे आणि त्याच्या या कार्याबद्दल स्वतः सोनूला काय वाटतं? हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोनूने कितीही जरी म्हटलं 'आय ऍम नो मसीहा' तरी ज्या लोकांना त्याने कठीण काळात मदत करुन त्यांच्या आशा पल्लवीत केल्या त्यांच्यासाठी तो नेहमीच मसीहा राहिल यात काही शंका नाही.
sonu sood book i am no messiah launched video became viral after sharing