अभिनेता सोनू सूदने महाराष्ट्र पोलिसांना दिली 'ही' भेट, गृहमंत्र्यांनी मानले आभार

sonu sood
sonu sood

मुंबई- कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये अभिनेता सोनू सूद हा अनेकांसाठी देवदूत बनला आहे. स्थलांतरित लोकांना त्यांच्या घरी सुखरुप पोहचवण्यासाठी सोनूने दिवसरात्र मेहनत केली आहे. त्याच्या या कामासाठी त्याचे अनेक स्तरातून कौतुकंही झालं. एवढी मदत केल्यानंतर अजुनही सोनू त्याच्या या कार्यातून मागे हटलेला नाही. स्थलांतरित प्रवासी, मजुर-कामगार यांची मदत केल्यानंतर आता सोनू महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. 

अभिनेता सोनू सूदने महाराष्ट्रातील पोलिसांसाठी २५ हजार फेसशिल्ड्स दान केल्या आहेत जेणेकरुन ते ड्युटीवर असताना कोरोनापासून त्यांचा बचाव होऊ शकेल. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर सोनू सूद सोबतचा फोटो शेअर करत यासाठी आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करत लिहिलंय, 'आमच्या पोलिस कर्मचा-यांना २५ हजार फेसशिल्ड्स देऊन दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मी सोनू सूदजी आपले आभार मानतो.'  

देशमुख यांनी सोनू सोबत आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते सोनूसोबत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना एकमेकांपासून दूर बसलेले दिसून येत आहेत. देशमुख यांच्या या ट्विटवर सोनूने उत्तर दिलं आहे.

सोनूने ट्विट करुन लिहिलं आहे, 'सर तुमचे आदररार्थी शब्द ऐकून मला सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. आपल्या पोलिसांमध्ये काम करणारे भाऊ-बहिण ख-या आयुष्यात हिरो आहेत. ते करत असलेल्या एवढ्या मोठ्या कामगिरीसाठी मी एवढं तर नक्कीच करु शकतो. जय हिंद.'

कोरोना व्हायरसच्या या जागतिक संकटामध्ये स्वतः केलेल्या कार्यावर सोनू सूदने एक पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. अजुन या पुस्तकाचं शिर्षक ठरलेलं नाही. या पुस्तकामध्ये लोकांची मदत करणे आणि या प्रवासातील काही भावनिक किस्स्यांसोबतंच आव्हानात्मक क्षणांचा देखील उल्लेख असेल. पेंग्विंन रेंडम हाऊस इंडिया या पब्लिकेशनने बुधवारी सांगितलं की हे पुस्तक या वर्षाच्या शेवटपर्यंत प्रकाशित होईल.   

sonu sood donates 25000 face shields to police personnel  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com