'यापेक्षा तू रक्तदान केलं असतंस तर...', चाहत्यावर जरा नाराजच झाला सोनू सूद

सोनू सूदच्या मुंबईतील घराबाहेर रोज त्याचे चाहते त्याला भेटण्यासाठी किंवा मदतीसाठी गर्दी केलेले दिसून येतात.
Sonu Sood get painting from fan who made it with blood
Sonu Sood get painting from fan who made it with bloodInstagram
Updated on

Sonu Sood: कोरोना दरम्यान सोनू सूदने गरीबांना आणि गरजवंतांना जी मदत केली आहे त्यामुळे त्याचा असा एक मोठा चाहतावर्ग आता निर्माण झाला आहे. सोनू आजही कोणाच्याही मदतीला धावून जातो. सोनूच्या घराच्या बाहेर नेहमीच गरजू लोकांची,गरीबांची गर्दी पहायला मिळते. हे सगळेच सोनूकडे कुठली नं कुठली अडचण घेऊन आलेले दिसतात. आणि तितक्याच प्रेमाने मदत मागायला येणाऱ्यांची चौकशी करणं,त्यांना मदत करणं या सोनूच्या स्वभावामुळे आता त्याच्याप्रती लोकांचे प्रेम वाढतच चालले आहे.(Sonu Sood get painting from fan who made it with blood)

Sonu Sood get painting from fan who made it with blood
इंडस्ट्रीत अभिनेत्यांचीही होते शिकार

काही दिवसांपूर्वीच त्याचा एक चाहता त्याला भेटायला आला तेव्हा एक गिफ्टही सोबत घेऊन आला, जे पाहिल्यानंतर सोनू मात्र हैराण झाला. त्या चाहत्यानं सोनूचं एक चित्र बनवून आणलं होतं. पण ते चित्र इतर चित्रांसारखं नव्हतं. कारण ते चित्र रंगांनी नाही तर त्या चाहत्याने आपल्या रक्तानं रंगवलं होतं. तो जेव्हा सोनूला भेटला तेव्हा म्हणाला की मी सोनूसाठी आपला जीवही देईन.

Sonu Sood get painting from fan who made it with blood
Sonu Sood get painting from fan who made it with bloodGoogle

सोनूने त्या व्यक्तिलाच नाही तर आपल्या सगळ्या चाहत्यांना त्यानंतर एक मेसेज दिला की,''चित्र रंगवण्यासाठी रक्त फुकट घालवण्यापेक्षा ते रक्तदान करुन योग्य कामी लावायला हवं '' सोनूने ट्वीटरवर एक व्हिडीओ रिट्वीट केला आहे. ज्यात चाहते त्याला भेटत आहेत. सोनू त्या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे की,''हे एक टॅलेन्टेड आर्टिस्ट आहेत. यांनी माझं चित्र काढलं आहे. तेव्हा चाहता मध्येच म्हणतो,रक्ताने. तेव्हा सोनू म्हणतो की, हेच तुम्ही चुकीचं केलं आहे की ते रक्ताने काढलं''.

Sonu Sood get painting from fan who made it with blood
ऋतुजा म्हणते,'लग्नापेक्षा स्वतःचं घर महत्त्वाचं'

तेव्हा तो चाहता सोनूला म्हणतो,'मी तुमच्यासाठी माझा जीवही देईन'. त्यावर सोनू म्हणाला,''मी तुमच्या भावना समजू शकतो,पण त्या रक्त वाया घालवून का व्यक्त केल्यात तुम्ही''. सोनू त्यानंतर व्हिडीओच्या शेवटी सगळ्यांना विनंती करताना दिसत आहे की,या आर्टिस्टला सपोर्ट करा आणि माझ्याही शुभेच्या कायम राहतीलच त्याच्यासोबत.

Sonu Sood get painting from fan who made it with blood
'या' आहेत बॉलीवूडच्या १० सिंगल मदर्स, प्रत्येकीची एक कहाणी...

त्यानंतर सोनूने व्हिडीओ शेअर करत विनंती केली आहे की,''रक्तदान करा,असं पेंटिंग बनवून वाया घालवू नका''.

सोनूच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात दिसला होता. आता तो लवकरच 'तमिलारासन' या तामिळ सिनेमात दिसणार आहे. याव्यतिरिक्त तो बॉलीवूडच्या फतेह सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाला अभिनंदन गुप्ता दिग्दर्शित करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com