esakal | सोनू सूद वाढदिवसाच्या दिवशी करतोय 'हे' खास काम, ५० हजार लोकांना होऊ शकतो फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

sonu sood birthday

सोनू सूदने आज त्याच्या वाढदिवसानिमित्त एक खास गोष्ट केली आहे. स्वतः सोनूने याविषयीची माहिती दिली आहे.

सोनू सूद वाढदिवसाच्या दिवशी करतोय 'हे' खास काम, ५० हजार लोकांना होऊ शकतो फायदा

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सोनू सूद आज त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. यावर्षीचा वाढदिवस सोनू एका खास पद्धतीने साजरा करणार आहे. सोनू गेले काही महिने कोरोना व्हायरसमुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान गरजुंना मदत करण्यासाठी चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा सोनू सूद त्याचा मदतीचा हात पुढे करत आहे. सोनू सूदने आज त्याच्या वाढदिवसानिमित्त एक खास गोष्ट केली आहे. स्वतः सोनूने याविषयीची माहिती दिली आहे.

हे ही वाचा: ''मुंबई पोलिसांमधील कुणीतरी रिया चक्रवर्तीला करतंय मदत''

सोनू सूदने त्याचा या वर्षीचा वाढदिवस लोकांसाठी समर्पित केला आहे..सोनूने त्याच्या वाढदिवसानिमित्त एका हेल्थ कॅम्पचं आयोजन केलं आहे. सोनूचं म्हणणं आहे की या कॅम्पद्वारे तो कमीतकमी ५० हजार लोकांची मदत करु शकेल. सोनू सूदने एका प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे की, 'मी अनेक दिवसांपासून प्लान करत होतो आणि सतत डॉक्टरांशी देखील बोलत होतो. यूपी, झारखंड, पंजाब आणि ओडिसाच्या डॉक्टरांशी बोलत होतो. मात्र आता आसाम आणि बिहारमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा हे पाहून आम्ही तिथे हे कॅम्प लावण्याच्या प्रयत्नात आहोत.' 

एवढंच नाही तर सोनूने पुढे सांगितलं, 'कोरोनाच्या काळात लावले जाणारे हे कॅम्प देखील खास आहेत. ज्यामध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी सगळ्याप्रकरची काळजी घेतली जाईल. आम्ही या दरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणार आहोत. जर आम्ही सांगितलं की आम्ही एका वेळेस ५ ते ६ हजार लोकांचं चेकअप करणार आहोत तर परिस्थिती खूप कठिण होऊन बसेल. म्हणूनंच याच्याशी दोन हात करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत आणि इतर काही जणांच्या संपर्कात आहोत.'

सोनूला त्याच्या कुटुंबाबाबत विचारलं असता तो म्हणाला की 'त्यांना माहित आहे की मी काय करत आहे. मी एकदा माझ्या मुलाला विचारलं की तु आनंदी नसशील ना कारण मी तुम्हाला वेळ देत नाहीये यावर माझा मुलगा म्हणाला की नाही बाबा लोकांची मदत करणं गरजेचं आहे. कुटुंबाची ही साथ मला आणखी ताकद देते'.

sonu sood has special plans for his 47th birthday health camp