गर्मीने घसा सुकला सांगत चाहत्याची सोनूकडे बिअरची डिमांड;सूदभाईचं कडक उत्तर Sonu sood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Sood

गर्मीने घसा सुकला सांगत चाहत्याची सोनूकडे बिअरची डिमांड;सूदभाईचं कडक उत्तर

अभिनेता सोनू सूद(Sonu Sood) त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या सामाजिक कार्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करु लागलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. त्यात कोरोना काळात त्यानं जे काही लोकांसाठी केलंय ते खरंच कौतूकास्पद आहे. त्यामुळे सिनेमांमुळे बनलेल्या त्याच्या चाहतावर्गातच नाही,तर अगदी सर्वसामान्य जनता जिचा कदाचित सिनेमाशी दूरदूरपर्यंत संबंध नसेल अशा लोकांच्या मनातही आपली जागा निर्माण केली. सोनू सूद लोकांच्या आजारपणापासून ते अगदी छोट्या-छोट्या अडचणींपर्यंत सर्वच गोष्टीत मदत करण्यासाठी पुढाकार घेतो. लोकं पण अगदी कुठलाच संकोच नं बाळगता मनापासून त्याच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागतात. पण कधी कधी मदतीच्या नावावर लोकं असं काय काय मागतात की स्वतः सोनू सूद देखील हैराण होऊन जातो.

नुकताच एक किस्सा सोनू सूदसोबत घडला. एका चाहत्यानं ट्वीटरवर मीम शेअर करीत विचारलं,''कडक उन्हाळ्यात सोनू सूद कुठे आहे? आम्हाला थडंगार बिअर नाही पाजणार का?'' मीम वर लिहिलं होतं,''थंडीत लोकांना उबदार ब्लॅंकेट दान केलंस,मग आता कडक उन्हात अंगाची लाही-लाही होत असताना थंडगार बीअर नाही देणार का?'' सोनूने मात्र यावर चाहत्याला मजेदार अंदाजात उत्तर दिलं आहे.

हेही वाचा: आलिया-रणबीरचं हनीमून डेस्टिनेशन झालं लीक

तो म्हणाला आहे,''बीयरसोबत भुजिया चालेल का?'' सोनू सूदच्या या मजेदार उत्तराला वाचून त्याचा तो चाहता त्याच्यावर भलताच खूश झाला आणि त्याची प्रशंसा करायला लागला. कोणी सोनू सूद च्या हजरजबाबीपणाची तर कोणी त्याच्या विनोदी स्वभावाची प्रशंसा केली. सोनू सूद गरीबांची आणि गरजूंची नेहमीच मदत करताना दिसला आहे. लॉकडाऊन दरम्यानही सोनूनं अनेक बेरोजगारांना काम मिळण्यासाठी मदत केली होती. सोनू सूद सध्या साऊथ आफ्रिकेत आहे,जिथे तो MTV Roadies season 18 ची शूटिंग करत आहे. याबरोबरच सोनू 'फतेह' आणि 'पृथ्वीराज' सिनेमात दिसणार आहे.

Web Title: Sonu Sood Has Witty Response To A Fans Bizarre Request And It Will Leave You In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..