आलिया-रणबीरचं हनीमून डेस्टिनेशन झालं लीक Alia Bhatt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt with Ranbir Kapoor
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चेंबुर स्थित 'आर.के हाऊस'मध्ये लग्नागाठ बांधणार आहेत. #esakal #ranbirkapoor #aliabhatt #honeymoondestination

आलिया-रणबीरचं हनीमून डेस्टिनेशन झालं लीक

बॉलीवूडच नाही तर समस्त प्रेक्षकगण,चाहतावर्ग ज्यांच्या लग्नाची वाट इतक्या दिवसांपासून पाहत होतं ते रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) अखेर लग्नबंधनात अडकत आहेत. १० दिवसांत ते दोघे चेंबूर येथील आर.के हाऊस मध्ये सात फेरे घेणार आहेत. आपल्या लग्नाच्या तयारीत बिझी असलेली आलिया भट्ट ६ एप्रिल,२०२२ रोजी आयोजित केलेल्या 'आरआरआर' सिनेमाच्या सक्सेस पार्टीला देखील हजर राहिली नव्हती. बातमी कानावर पडतेय की, कपूरांचं चेंबूरमधील पूर्वंजांचं जुनं घर असलेलं 'आर के हाऊस' लग्नासाठी सजवण्यात येत आहे. लग्नस्थळी तयारी सुरु झालीय. मेहेंदी,संगीत पासून लग्नापर्यंतच्या सगळ्या तारखा सीक्रेट्स ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न आलिया-रणबीरकडून करण्यात आला पण शेवटी त्या लीक झाल्याच.

हेही वाचा: रणबीर-आलियाच्या लग्नाशी नंबर '8' चं आहे मोठं कनेक्शन; वाचा सविस्तर

लग्नसोहळा ईटाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार १३ किंवा १४ एप्रिलपासूनच सुरू होणार आहे. पंजाबी पारंपरिक पद्धतीनं हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. तब्बल ३ ते ४ दिवस या सोहळ्याशी संबंधीत कार्यक्रम सुरु राहणार आहेत. लग्न ज्या दिवशी होणार त्या तारखेचं विचाराल तर ते १६ एप्रिलला भल्या पहाटे २ ते ४ च्या दरम्यान होणार हे जसं प्रत्येक पंजाबी लग्न पार पडतं. आधी १७ एप्रिल तारिख सांगितली गेली होती पण रणबीरचा लकी नंबर ८ आहे आणि न्यूमरोलॉजि प्रमाणे लग्न आता १६ एप्रिल रोजी पार पडेल. अजूनतरी कपूर किंवा भट्ट कुटुंबाकडून या लग्नाविषयी चुप्पी साधण्यात आली आहे.

हेही वाचा: मध्यरात्री अमिताभ बच्चन यांचा पारा चढला; थेट पोस्ट करुनच व्यक्त केला राग

सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार लग्नानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हनिमून साठी स्वित्झर्लंडला जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच बातमी होती की करण जोहरने आपला सिनेमा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चं पुढचं शेड्युल हे स्वित्झर्लंडलाच प्लॅन केलं आहे. या सिनेमातील आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यावरचं एक गाणं तिथे शूट केलं जाणार आहे. बोललं जात आहे की या गाण्याचं शूट मे किंवा जून मध्ये होणार आहे. आणि आलिया १० दिवसांसाठी तिथे जाणार आहे. त्यामुळे खबर आहे की रणबीरही आलियासोबत स्वित्झर्लंडला जाणार आहे. आधी बातमी होती की दोघांच्या व्यस्त शूटिंग शेड्युलमुळे ते हनिमूनला नंतर कधीतरी जाणार आहेत.

Web Title: Alia Bhatt And Ranbir Kapoor Haneymoon Destination

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..