सोनू सूद बनला देव, मंदिर बनवून 'या' गावातील लोक करतायेत सोनूच्या मुर्तीची पुजा

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 22 December 2020

४७ वर्षीय सोनुच्या नावावर एक मंदिर बनवून त्याला सन्मानित केलं आहे. गावातील लोकांनी या मंदिराची निर्मिती सिद्दीपेट जिल्ह्या अधिका-यांच्या मदतीने केली आहे.  

मुंबई- अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांची मदत केली आहे लोक त्यांना देवदूताची उपमा देत आहेत. सोनूचे आभार व्यक्त करण्यासाठी कोणी त्यांच्या मुलांना सोनूचं नाव दिलं, तर कोणी सोनूच्या नावाने दुकान, हॉटेल सुरु केलं. मात्र तेलंगणा येथील एका गावातील लोकांनी सोनूला थेट देवाचाच दर्जा दिला आहे. तेलंगणा राज्यातील डुब्बा टांडा या गावातील लोकांनी ४७ वर्षीय सोनुच्या नावावर एक मंदिर बनवून त्याला सन्मानित केलं आहे. गावातील लोकांनी या मंदिराची निर्मिती सिद्दीपेट जिल्ह्या अधिका-यांच्या मदतीने केली आहे.  

हे ही वाचा: 'बिग बॉस'मध्ये पोहोचल्या भाजप नेत्या सोनाली फोगट, सोशल मिडियावर फोटो व्हायरल  

मंदिराचं लोकार्पण मुर्तीकार आणि स्थानिक लोकांनी केलं. इतकंच नाही तर सोनूची आरती देखील त्या लोकांनीच गायली. सोनूला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे. तेथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की महारोगराईच्या काळात सोनूने लोकांची मदत केली आहे. अशातंच आमच्यासाठी हा आनंदाचा विषय आहे की आम्ही त्याचं मंदिर बनवलं आहे. 

दुसरीकडे अभिनेता सोनू सूद लोकांच्या या प्रेम भावनेने भारावून गेला आहे. सोनूने यावर त्याची प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, हा माझ्यासाठी अत्यंत भावूक करणारा क्षण आहे. मात्र मला हे जरुर सांगायचं आहे की याची खरंच गरज नाही आहे. मी एक सामान्य माणूस आहे ज्याने त्याच्या भावाबहीणींची मदत केली आहे. 

लॉकडाऊनमध्ये सोनू सूदने मुंबईमध्ये अडकलेल्या अनेक प्रवासी मजुरांना देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहणा-या लोकांना त्यांच्या घरी पोहोचवलं होतं. सोनू आणि त्याच्या टीमने मजुरांना टोल फ्री नंबर आणि व्हॉट्सअप नंबर दिला होता. इतकंच नाही तर त्याच्या या कार्यासाठी सर्व स्तरांतून त्याचं कौतुक झालं तसंच त्याने अनेक सन्मान देखील मिळाले.   

sonu sood humbled after telangana locals dedicate a temple to him  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonu sood humbled after telangana locals dedicate a temple to him