esakal | बोलतो ते करुन दाखवतो, शेतात राबणा-या मुलींच्या घरी काही तासांत सोनू सूदने पोहोचवला ट्रॅक्टर
sakal

बोलून बातमी शोधा

sonu sood

एका शेतकरी कुटुंबाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर सोनू सूदने त्याचा उदारपणा दाखवला आहे.

बोलतो ते करुन दाखवतो, शेतात राबणा-या मुलींच्या घरी काही तासांत सोनू सूदने पोहोचवला ट्रॅक्टर

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सोनू सूद कोरोना व्हायरसच्या संकटकाळात लोकांसाठी देवदूत बनला आहे. सोनूने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे की ही उपमा त्याच्यासाठी अजिबात चूकीची नाहीये. सोनू सूदने काही तासांच्या आतंच त्याचं वचन पूर्ण केलं आहे. 

हे ही वाचा: एका दिवसात तीस कप चहा प्यायचा गब्बर सिंह, अमजद खान यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याविषयीच्या काही रंजक गोष्टी

एका शेतकरी कुटुंबाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर सोनू सूदने त्याचा उदारपणा दाखवला आहे. सोशल मिडियावर एका गरीब शेतकरी कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आंध्रप्रदेशमधील असल्याचं म्हटलं जातंय. व्हिडिओमध्ये एक असाहाय्य शेतकरी त्याच्या दोन मुलींना शेतात राबवत आहे. त्यांच्याजवळ एवढे पैसे नाहीयेत की ते बैल भाड्याने घेऊ शकतील.

व्हिडिओमध्ये मुली ज्याप्रकारे मेहनत करुन शेतात राबत आहेत ते पाहून त्याचं हृदय भरुन आलं आहे. सोनू सूदने पुढाकार घेऊन त्या कुटुंबाची मदत करण्याची घोषणा केली होती. आणि काही तासांतच त्याने त्या कुटुंबाच्या घरी ट्रॅक्टर पाठवला आहे. नुकतंच सोनू सूदने दशरथ मांझी कुटुंबाला देखील आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती.

अशांतच सोशल मिडियावर प्रश्न उपस्थित होत आहेत की अखेर सोनू सूद इतक्या सगळ्या लोकांची मदत कशी करणार? तर दुसरीकडे अनेक युजर्स सोनू सूदच्या पुढाकाराचं कौतुक करत आहेत.सोशल मिडियावर युजर्स सोनू सूदची एवढी स्तुती करत आहेत तर दुसरीकडे ज्यांना मदत मिळाली आहे ते सोनू सूदला देवदूत, देव अशा उपमा देत आहेत. सोबतंच सोनू सूद परदेशात फसलेल्या हजारो विद्यार्थ्यांना देशात परत आणत आहेत. विमानाने या सगळ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  

sonu sood provides a tractor to girls ploughing field as per promise