esakal | 'मदत करण्याची इच्छा आहे पण, सोनुनं मांडली व्यथा'...
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Sood

'मदत करण्याची इच्छा आहे पण, सोनुनं मांडली व्यथा'...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता सोनु सुद हा त्याच्या मदतशील स्वभावामुळे सर्वांना परिचित आहे. त्यानं आजवर मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. आणि ते यशस्वीही करुन दाखवले आहेत. त्याच्या या स्वभावामुळे त्याला प्रचंड मोठा फॅन फॉलोअर्सही आहे. तो सतत कुणाची मदत करत असतो. या कारणानं अनेकांसाठी त्यानं देवदुताची भूमिका पार पाडली आहे. मात्र दरवेळी सोनुला सर्वांना मदत करणं शक्य होत नाही. तेव्हा तो निराशही होतो. त्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात त्यानं आपल्याला ज्यावेळी दुस-यांना मदत करायची असते तेव्हा पदरी येणा-या निराशेविषयी सांगितले आहे.

जेव्हा त्याच्या एक चाहत्याला मदतीची गरज होती त्यावेळी आपण ती मदत करण्यास असहाय्य असल्याची भावना सोनुनं व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्याची ही पोस्ट व्हायरलही झाली आहे. याप्रसंगी काहीतरी जादु व्हावी अन् सगळं काही बदलून जावं असंही त्यानं म्हटलं आहे. खरं तर कोरोनाच्या काळात सोनु सुदनं वेगवेगळ्या उपक्रमांमधून लोकांना मदत केलीय. आणि त्यामुळे तो त्यांच्यासाठी देवदुत ठरला आहे. देशाच्या कानाकोप-यातून त्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेनं लोकं येत असतात.

sonu sood post

sonu sood post

कुणालाही निराश न करणं हाही सोनुचा एक महत्वाचा गुण आहे. सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत सोनुनं अनेकांना मदतीचा हात दिला आहे. अन्न, धान्य, सॅनिटायझर, मास्क, औषधे याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लॅपटॉपचेही वाटप त्यानं केलं आहे. सोशल मीडियावर सोनुचे एक व्टीट व्हायरल झाले आहे. त्यानं यावेळी एका व्यक्तीनं ज्या मदतीची याचना केली त्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढून तो शेअर केला आहे. त्या व्यक्तीच्या बहिणीला तातडीनं आयसीयुमध्ये अॅडमिट करणं गरजेचं होतं.

हेही वाचा: COVID 19: विराट-अनुष्काकडून दोन कोटींची मदत

हेही वाचा: असं आहे आदर पुनावालांचं मलायका, करिनासोबतचं कनेक्शन

यासगळ्या परिस्थितीवर सोनुनं म्हटलं आहे की, मला अशावेळी फार वाईट वाटतं जेव्हा आयसीयुमध्ये अॅडमिट असणा-या एखाद्याला मला मदत करता येत नाही. त्यावेळी मी असहाय्य असतो. याप्रसंगी एखादी जादु घड़ावी असं मला वाटतं. जेव्हा काही शक्य होत नाही तेव्हा माझ्याजवळ प्रार्थना करण्याशिवाय आणखी दुसरा कुठला मार्ग नसतो.