
'सोनु ने सोनु की सुन ली भाई!' अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव
Sonu Sood: कोरोनाच्या काळात बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी लोकांना मदतीचा हात दिला होता. टॉलीवूडच्या सेलिब्रेटींचा मोठा आदर्श बॉलीवूडच्या (Bollywood News) सेलिब्रेटींनी ठेवल्याचे दिसून आले होते. यासगळ्यात बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनु सुद चर्चेत आला होता. त्यानं कोरोनाच्या (Bollywood Actor) काळात हजारो लोकांना मदतीचा हात दिला. व्हेंटिलेटर देणे, गरजुंना बेड पुरवणे, गरीबांना अन्नधान्याचे वाटप करणे अशी मोठी मदत सोनु सुदनं केली होती. केवळ अभिनेता नव्हे तर एक समाजसेवक आणि मदतीला धावून येणारा अभिनेता अशी ओळख सोनु सुदनं तयार केली आहे. तो आता पुन्हा एकदा त्याच्या सामाजिक उपक्रमामुळे चर्चेत आला आहे.
कोरोनाच्या काळात ज्या व्यक्तींना मोठया त्रासाला सामोरं जावं लागलं त्यात अभिनेता सोनु सुदनं अनेकांना मदतीचा हात दिला होता. त्यानं सोशल मीडियावर व्टिट करुन त्याविषयी माहिती दिली होती. एका मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासंबंधी अनेक अडचणी येत होत्या. ती बातमी जेव्हा सोनुला कळली तेव्हा त्यानं तातडीनं त्या मुलाची मदत केल्याचे दिसून आले. त्याला केवळ प्रवेशच नाही तर हॉस्टेल देखील मिळवून देण्यात सोनुनं महत्वाची भूमिका पार पाडल्याचे दिसून आले आहे. सध्या सोनु सुद हा बिहारच्या सोनुमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
अकरा वर्षांच्या सोनुसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकांना आवाहन केले होते. सोनुच्या अभ्यासाचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला होता. यावेळी सोनुनं ट्विट करुन दुसऱ्या सोनुला मदतीचा हात दिला आहे. त्यानं शेयर केलेल्या एका पोस्टमध्ये आपण सोनुला केवळ शाळेत अॅडमिशन नाहीतर त्याच्यासाठी हॉस्टेलची व्यवस्था देखील केल्याचे सांगितले आहे. लोकांनी सोनुच्या पोस्टचं कौतुक केलं आहे. त्याला धन्यवाद दिले आहे.