Video: 'वाराणशीला आलो हे माझं दुर्देव'; अभिनेता अर्जुन रामपालची जीभ घसरली Arjun Rampal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Rampal

Video: 'वाराणशीला आलो हे माझं दुर्देव'; अभिनेता अर्जुन रामपालची जीभ घसरली

अभिनेता अर्जुन रामपाल(Arjun Rampal) सध्या आपल्या 'धाकड'(Dhaakad) प्रमोशनमध्ये भलताच बिझी आहे. कंगना रनौत(Kangana Ranaut) च्या 'धाकड' सिनेमात अर्जुन रामपाल खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्याच्या भूमिकेचं प्रदर्शनाआधीच खूप कौतूक केलं जात आहे. या सिनेमाच्याच प्रमोशनसाठी अर्जुन रामपाल वाराणसीला(Varanasi) गेला होता. इथे एका कार्यक्रमात धाकड सिनेमा आणि वाराणसी विषयी बोलताना अर्जुन एक घोडचूक करून बसला. अर्जुन रामपाल म्हणाला,''हे माझं दुर्देव आहे कि मला वाराणसीत येऊन सिनेमाचं प्रमोशन करायची संधी मिळाली''.

सध्या सोशल मीडियावर अर्जुन रामपालचा हे असं वक्तव्य केलेला व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीनं त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अर्जुन रामपाल म्हणाला आहे,''मी पहिल्यांदाच वाराणसीला आलो आहे. मला खूप दिवसांपासून इथे येण्याची इच्छा होती. मी काय बोलू वाराणसी विषयी . मला इथून एक सुंदर जपमाळ भेट म्हणून मिळाली आहे. मी ती माझ्या गळ्यात आता कायम घालणार आहे. मी भगवान शंकराचा मोठा भक्त आहे. मी माझ्या कुटुंबासोबत इकडे एकदा नक्की येईन आणि जास्त वेळ घालवेन. हे माझं चांगलं दुर्भाग्य आहे,की मला ही संधी मिळाली. मी पहिल्यांदाच इथे पत्रकार परिषदेत बोलत आहे. आणि हा अनुभव थक्क करणारा आहे''. अर्जुननं चुकून 'दुर्भाग्य' शब्द उच्चारला अन् याची एकच चर्चा रंगली.

काही दिवसांपूर्वी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन रामपालनं हिंदी भाषा वादावर देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. ''आपला देश विविध संस्कृतीनं नटलेला देश आहे. इथे खूप भाषा बोलल्या जातात. अनेक परंपरा आपल्या देशात पहायला मिळतात. आपण त्या सगळ्याचाच सम्मान केला पाहिजे. भाषेपेक्षा त्यातील भावनांना महत्त्व द्या. हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे आणि याचा आदर हा करायलाच हवा'',असं तो म्हणाला होता.

कंगना रनौत आणि अर्जुन रामपाल अभिनय करीत असलेला हा सिनेमा २० मे,२०२० रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात दिव्या दत्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वीच भगवान शंकराची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाराणसी आणि काशी मध्ये विश्वनाथ मंदिरात 'धाकड' सिनेमाची टीम दर्शनासाठी आणि त्या माध्यमातून सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी गेली होती.