शेतक-यांच्या आंदोलनावर अभिनेता सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

sonu sood
sonu sood

मुंबई- सध्या देशभरात चर्चा आहे ती शेतक-यांच्या आंदोलनाची. अन्नदाता त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी अनेक दिवसांपासू रस्त्यावर उतरले आहेत. शेतक-यांच्या या आंदोलनाविषयी मत व्यक्त करताना बॉलीवूडमध्ये दोन गट पडले आहेत. एकीकडे अभिनेत्री कंगना रनौत या आंदोलनाच्या विरोधात आहे तर दुसरीकडे मिका सिंह, दिलजीत दोसांज, हिमांशी खुराना सह अनेक सेलिब्रिटी या शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्या पाठिशी उभे आहेत. आता अभिनेता सोनू सूद देखील शेतक-यांना समर्थन देण्यासाठी पुढे आला आहे.

बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने शेतक-यांना समर्थन देत ट्विट केलं आहे. शेतक-यांचं महत्व सांगत त्याने ट्विटमध्ये शेतक-यांना संपूर्ण हिंदुस्तानाची उपमा दिली आहे. सोनूने ट्विट करत लिहिलंय, ''किसान है हिंदुस्तान''. सोनू सूदचं हे ट्विट व्हायरल झालं आहे आणि त्याच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. सोनू नेहमीच सोशल मिडियावर ऍक्टीव्ह असतो. चालू घडामोडींवर तो अनेकदा त्याचं मत परखड मांडताना दिसतो. चाहते तर त्याच्या मताचा नेहमी आदर करतात. 

सोनू सूद व्यतिरिक्त बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी शेतक-यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत आहेत. मात्र या प्रकरणावर कंगना रनौतने दिलेल्या वादग्रस्त कमेंटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी एका ट्विटमध्ये म्हटलं होतं की वृद्ध महिला शेतक-यांच्या या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आणि नंतर त्यांनी म्हटलं की १०० रुपयांसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो. तिच्या या ट्विटनंतर सोशल मिडियावर ती खूप ट्रोल झाली होती. परिणामी तिने ते ट्विट डिलीट देखील केलं होतं.    

sonu sood tweeted in support of farmers says farmer is hindustan  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com