sonu sood
sonu sood

सोनू सूद यापुढे नाही साकारणार खलनायकांच्या भूमिका, 'हे' आहे कारण

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे कित्येकांचं नुकसान झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. मात्र अशा कठीण परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने गरजुंना मदतीचा हात पुढे केला आहे.. त्याच्या या कृत्याचं अनेक स्तरांतून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे या समाजसेवेचा सोनूच्या खाजगी आयुष्यावर देखील फार प्रभाव पडला आहे. त्यामुळे आता सोनूने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार सध्या सोनू सूदला अनेक सिनेमांच्या ऑफर मिळत आहेत. मात्र यातील अनेक सिनेमांमध्ये त्याला खलनायकांचेच रोल साकारण्याची ऑफर दिली जात आहे. सोनूने आता यामुळेच खलनायकांच्या भूमिका साकारण्यासाठी नकार दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने अनेक गरजुंची भेट घेतली. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचा त्याने खूप जवळून अनुभव घेतला. या अनुभवामुळे लोकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींबाबत त्याच्या मनात तिरस्कार निर्माण झाला. आणि म्हणूनंच त्याने आता ठरवलं आहे की तो सिनेमांमध्ये देखील खलनायकाच्या रुपात झळकून कोणाला त्रास देऊ शकत नाही. तेव्हा आता यापुढे केवळ नायकांच्याच भूमिका साकारण्याचा निर्णय त्याने घेतला असल्याचं कळतंय.

अभिनेता सोनू सूदने साऊथच्या बहतांश सिनेमांमध्ये खलनायकाचीच भूमिका साकारली आहे. मात्र असं असलं तरी त्याला प्रेक्षकांनी तेवढंच प्रेम दिलं आहे. आता तर त्याने नायकाची भूमिका साकारण्याचा निर्मय घेतल्याने त्याचे चाहते आणखीनं खुश आहेत. सोनूने लॉकडाऊनच्या काळात देशाच्या कानाकोप-यात अडकलेल्या शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम केलं होतं..इतकंच नाही तर त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. “शेवटचा मजूर घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. सोनूने देशावर ओढवलेल्या या संकटात माणुसकीच्या रुपात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

sonu sood wont do villain roles says im being offered many good roles  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com