
‘तांडव’ वेब सीरिज ही राजकारणावर आधारित असून अली अब्बास जफरने याची निर्मिती केली आहे.१ मिनिट २० सेकंदाच्या या टिझरमध्ये सैफअली खानचा धमाकेदार अंदाज दिसून येतोय.
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री डिम्पल कपाडिया, तिग्मांशु धुलिया, सुनील ग्रोवर स्टारर आगामी ‘तांडव’ या वेबसिरीजचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ही सीरिज ऍमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. ‘तांडव’ वेब सीरिज ही राजकारणावर आधारित असून अली अब्बास जफरने याची निर्मिती केली आहे.१ मिनिट २० सेकंदाच्या या टिझरमध्ये सैफअली खानचा धमाकेदार अंदाज दिसून येतोय.
हे ही वाचा: कमी वेळात जास्त सिनेमे केल्याने झाली अक्षय कुमारची स्तुती, मात्र अभिषेक बच्चनला आला राग
‘तांडव’ या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. टीझरमध्ये सैफ अली खान हा एका राजकीय नेत्याची भूमिका साकारत असल्याचं दिसतंय. सैफचा हा हटके अंदाज पाहण्यासाठी चाहते खूपंच उत्सुक आहेत. तांडव या वेबसिरीजचे एकुण नऊ भाग असणार आहेत. त्यामुळे अर्थातच ही सिरीज उत्सुकता वाढवण्यात यशस्वी ठरेल यात शंका नाही.
मुख्य कलाकारांमध्ये सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार झळकतील.
'तांडव' या वेबसिरीजच्या माध्यमातून अभिनेत्री डिंपल कपाडिया डिजीटल आणि अली अब्बास जफर डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहेत. तसंच या सीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खान, झीशान अय्यूब आणि सुनील ग्रोव्हर यांचा हटके अंदाज प्रेक्षकांना सरप्राईज देणारा असेल. ‘तांडव’ ही वेब सीरिज १५ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
tandav teaser released watch saif ali khan powerful avatar