'त्या' व्हायरल फोटोला दिशा सालियनसोबत जोडण्यावरुन भडकला सूरज पांचोली, सांगितलं फोटोमागचं सत्य

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 6 August 2020

सोशल मिडियावर अभिनेता सूरज पांचोली आणि सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र या व्हायरल फोटोमागचं सत्य काही वेगळंच आहे.

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला अनेक दिवस लोटले आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस करत आहेत. मात्र आता हे प्रकरण सीबीआयच्या हाती सोपवण्यात आलं आहे. या दरम्यान सोशल मिडियावर अभिनेता सूरज पांचोली आणि सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र या व्हायरल फोटोमागचं सत्य काही वेगळंच आहे.

धक्कादायक: 'कहानी घर घर की' फेम अभिनेता समीर शर्माची आत्महत्या

या व्हायरल फोटोमधून असा दावा केला जात होता की सूरज दिशा आणि सुशांत या दोघांचा मित्र होता मात्र दोघांशीही त्याचं चांगलं नव्हतं. आता सूरज पांचोलीने एक पोस्ट लिहून या फोटोचं सत्य सगळ्यांसमोर उघडकीस आणलं आहे. सूरजने लिहिलंय, 'पूर्णपणे चूकीची बातमी. ही तीच प्रसिद्धी माध्यमं आहेत का की ज्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सांगितलं जातं. हा फोटो २०१६ सालचा आहे. या फोटोमध्ये दिसणारी मुलगी दिशा नाही तर माझी मैत्रीण अनुश्री गौर आहे. जी इथे भारतात राहत देखील नाही.' 

सूरजने पुढे लिहिलंय, मा कधी दिशाला भेटलो देखील नाही. लोकांचं ब्रेनवॉश करणं बंद करा आणि माझं नाव या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करु नका. मला त्रास देऊ नका. तुम्ही तुमच्या कामाप्रती जबाबदारीने वागा कारण यामुळे एखाद्याच्या आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. सूरजने लिहिलंय की त्याने याआधी याबाबत खुलासा केला होता की, मी दिशा सालीयन या मुलीला माझ्या आयुष्यात कधी भेटलो नाही आणि कधी तिच्याशी बोललो देखील नाही. तुमच्या फेक न्यूजचा वैताग आला आहे. असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sooraj pancholi viral pic with disha salian now actor reveals photo truth